अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
तिकीट काऊंटरवर लांबलचक रांगेमुळे अनेक वेळा अनारक्षित म्हणजेच जनरल तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत ट्रेन चुकते. अशा परिस्थितीत मोबाइलवरून ऑनलाइन तिकीट काढणे मदतीचे ठरते. यूटीएस मोबाईल अॅप तुम्हाला या कामात मदत करेल. या अॅपवरून सामान्य तसेच प्लॅटफॉर्म तिकीट सहजपणे काढता येते. हे अॅप भारतीय रेल्वेने सुरू केले आहे. ज्याद्वारे प्लॅटफॉर्मवरुन मोबाईलद्वारे तिकीट बुक करता येईल. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया…
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे आरक्षित अर्थात सामान्य तिकीट बुक करण्याची सुविधा दिली जात आहे. यासोबतच देशातील सुमारे ३७५ पोस्ट ऑफिसमध्ये संगणकीकृत पीआरएस काउंटर बसवण्यात आले आहेत. याशिवाय अधिकृत तिकीट एजंट आणि यात्री तिकीट सुविधा केंद्र (YTSK) मार्फत ई-तिकीट बुकिंगची सुविधा देखील प्रदान करण्यात आली आहे.
यूटीएस अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. अॅप वापरण्यासाठी लोकेशन, कॉल आणि मेसेज अॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल. UTS अॅप डाउनलोड केल्यानंतर त्याची नोंदणी करावी लागेल. अॅप उघडल्यावर लॉगिनच्या तळाशी खाते नोंदणीचा पर्याय दिला जातो. नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यावर, मोबाइल नंबर, नाव पासवर्ड आणि पुष्टी केलेला पासवर्ड सोबत जेंडर आणि जन्मतारीख तपशील भरणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्हाला टर्म आणि कंडिशनवर टॅप करून नोंदणी करावी लागेल. अशा प्रकारे यूटीएस अॅपवरून तिकिटे बुक करता येईल. यूटीएस हे लाइटवेट १४ MP अॅप आहे, जे १० दशलक्षाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे.