मुंबई – एक गोष्ट इंटरनेटवर सर्च केली की त्या संदर्भातील मेसेजेस आणि स्पॅम कॉल्स यायला सुरुवात होते. बरेचदा मोबाईल नंबर्सवरून कॉल येतात. त्यामुळे लक्षात येत नाही. आपण घाईत असतो किंवा कामात असताना हे कॉल्स आले की अधिकच संताप वाढतो. पण अMe कॉल्सपासून बचाव करायचा असेल तर तीन प्रकारचे मार्ग आहेत. ते आपण जाणून घेऊया…
पहिला मार्ग
फ्लाईट मोड अॅक्टीव्ह न करता इनकमिंग कॉल्स रोखण्यासाठी स्मार्टफोनच्या कॉल सेटिंगमध्ये जायचे. इथे जाऊन कॉल फॉरवर्डिंगच्या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला तीन आप्शन्स दिसतील. यात आलवेज फॉरवर्ड, फारवर्ड व्हेन बिझी आणि फॉरवर्ड व्हेन अनअॅन्सर्ड हे तीन पर्याय दिसतील. तुम्ही आलवेज फॉरवर्डचा पर्याय निवडा. इथे स्पॅम नंबरला त्या नंबरवर फॉरवर्ड करा जो बंद आहे. त्यानंतर इनेबल बटणवर क्लिक करा. स्पॅम कॉल्स येणे बंद होईल.
दुसरा मार्ग
मोबाईलमध्ये फोन अॅप उघडा आणि रिसेंट कॉल्सच्या आप्शनमध्ये जा. कॉल लिस्टमध्ये त्या नंबरला निवडा जो तुम्हाला स्पॅममध्ये टाकायचा आहे. त्यानंतर ब्लॉक/रिपोर्ट स्पॅम पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तो नंबर ब्लॉक होईल व भविष्यात कधीच त्या नंबरवरून कॉल येणार नाही.
तिसरा मार्ग
तुम्ही एक कॉल करूनही येणारे स्पॅम कॉल्स ब्लॉक करू शकता. स्पॅम कॉल्स ब्लॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून 1909 या नंबरवर कॉल करा. त्यानंतर फोनवर मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा. त्यात डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी) अॅक्टीव्ह करा.