इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लवकरच अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे या चित्रपटात दिसणार आहे. पण चित्रपटांपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. ते कारण म्हणजे सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणातही तिचे नाव जोडले जाणे. आता समोर आलेल्या माहितीनुसार सुकेशने जॅकलिनला करोडो रुपयांची अंगठी गिफ्ट देऊन प्रपोजही केलं होतं. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने जॅकलिन फर्नांडिसची कसून चौकशी केली आहे. या चौकशीत अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. असंही म्हटलं जातंय की ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी दिली होती, ज्यावर J आणि S लिहिले होते. याआधी सुकेश चंद्रशेखर हे गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाचा गैरवापर करून जॅकलिन फर्नांडिसला भेटायला गेला होता, अशी बातमीही आली होती. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे काही वैयक्तिक फोटोही व्हायरल झाले आहेत. जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश याच्यात काही मतभेद झाले होते. ते दूर करण्यासाठी सुकेशने पिंकी इराणीला १० कोटी रुपये देण्याचे वचन दिले होते. यानंतर त्याने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले. पिंकी इराणी अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सना तिहार जेलमध्ये सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी घेऊन गेली होती. सुकेशशी ओळख करुन देणे हे त्यामागील कारण होते. पिंकी इराणीच्या माध्यमातून सुकेश चंद्रशेखरला भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूरला इम्प्रेस करायचे होते. त्या बदल्यात तो त्यांना महागड्या भेटवस्तू द्यायचा. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिसचे वैयक्तिक क्षणांचे फोटोही व्हायरल झाल्याने हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं.