विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनामुळे काही चाचण्या आपण घरीच करतो. त्यातीलच एक म्हणजे थर्मामीटरच्या सहाय्याने ताप मोजणे. पण, नक्की किती फॅरेनाईट म्हणजे ताप असतो आणि किती फॅरेनाईट हा सर्वसाधारण असतो याबाबत बहुतांश जणांना माहिती नसते. आपल्याकडे काचेचे किंवा प्लास्टिकचे थर्मामीटर असते. जे प्लास्टिकचे (सेलचे) थर्मामीटर असते त्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. तर, जे काचेचे असते ते सांभाळणे खुप नाजूक असते. त्यामुळे बहुतांश जणांकडे प्लास्टिकचेच थर्मामीटर असते. आता आपण जाणून घेऊ या की किती तपमान म्हणजे नेमके काय
जर तपमान ९८.६ फॅरेनाईट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ताप नाही
जर तपमान ९९.० फॅरेनाईट किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर थोडा ताप असतो
जर तपमान १००.० ते १०२.० फॅरेनाईट असेल तर तो जास्त ताप असतो
तुम्हाला जर ताप असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत असाल तरी सुद्धा घरी दर दोन तासांनी ताप मोजा आणि तो नोंदवून ठेवा. याद्वारे आपल्याला लक्षात येईल की तापात सातत्य आहे, तो कमी होतो आहे किंवा वाढतो आहे.