नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, तेथे जेवल्यानंतर तुम्हाला जे बिल मिळते, त्यामध्ये अनेक प्रकारचे शुल्क वसूल केले जाते. रेस्टॉरंटचे बिल तुम्ही बारकाईने बघितले तर त्यामध्ये सेवा शुल्काचाही समावेश असतो. ग्राहकांकडून वसूल केले जाणारे हे सेवा शुल्क पूर्णपणे चुकीचे आहे. आणि आता त्यासंदर्भात केंद्र सरकारनेच घोषणा केली आहे. यापुढे सेवा शुल्क आकारले जाणार नाही, असे ग्राहक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
रेस्टॉरंट आणि ग्राहक संघांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह बोलत होते. सिंह सांगितले की, ग्राहकांकडून सेवाशुल्क वसूल करणाऱ्या रेस्टॉरंटना रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर चौकट आखून दिली आहे. सेवाशुल्क वसूल करणे कायदेशीररित्या चुकीचे नाही, असा दावा रेस्टॉरंट आणि हॉटेल संघांनी केला होता. शुल्क वसूल करण्याची कृती ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. तसेच हा अयोग्य व्यापार व्यवहार आहे, असे ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.
२०१७ रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना हॉटेल व रेस्टॉरंट चालकांनी लागू केलेल्या नाहीत. दिशानिर्देशांना सामान्यपणे कायदेशीर चौकटीत बसवता येत नाहीत. कायदेशीर चौकट तयार केल्यास हॉटेल आणि रेस्टॉरंटचालकांना ते लागू करण्यास बंधनकारक असेल. सामान्यपणे ग्राहकांचा सेवाशुल्क आणि सेवाकर यामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे ते याचे पेमेंट करतात. आता यापुढे सेवाशुल्क ग्राहकांना आकारता येणार नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
येथे करा तक्रार
सक्ती नसतानाही हॉटेल किंवा रेस्टॉरंटकडून सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) आकारत असेल तर त्यासंदर्भात ग्राहकांना तक्रार करता येणार आहे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन 1915 वर ग्राहकांना ही तक्रार करता येईल. तसेच, ग्राहक मंचाकडेही दाद मागता येईल.
https://twitter.com/ANI/status/1543937231299440640?s=20&t=eqBL45vWrZRMZ3_QYu2bJQ
Hotel Restaurant service charge Consumer Affairs ministry