इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही व्यक्ती सहल किंवा पर्यटनासाठी जाते, तेव्हा त्या प्रांतातील प्रसिद्ध किंवा चविष्ट खाद्यपदार्थांची चव घेते, मग महाराष्ट्रातील पुरणपोळ्या असो कि गुजरातमधील खंमग ढोकळा असो. दक्षिण भारतात देखील असेच काही खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत, त्यापैकीच केरळमधील मसाल डोसा प्रसिद्ध मानला जातो. त्यामुळे सहाजिकच याची चव घ्यावी, असे पर्यटकांना वाटते. मात्र मसाला डोसा खाणाऱ्या काही पर्यटकांना ही गोष्ट खूपच महाग पडले. इतकेच नव्हे तर वेगळाच अनुभव आला. काही पर्यटक केरळ मध्ये गेले असता त्यांनी एका हॉटेल मध्ये जाऊन मसाला डोसा आणि सांबर ऑर्डर केली. तेव्हा वेगळेच घडले.
केरळमधील कोट्टायम येथील सहा प्रवाशांनी इडुक्की जिल्ह्यातील नेदुमकंदममध्ये हॉटेलमध्ये रूम बुक केली त्यानंतर सर्व पर्यटक नाश्ता करण्यासाठी त्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी मसाला डोसा आणि सांबर मागितले. सांबराच्या वाढलेल्या किमतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी पर्यटकांना वेठीस धरले.
हॉटेल मालकाने प्रत्येक डोसा व सांबर सर्व्हिंगसाठी ६० ऐवजी १०० रुपये आकारले. वाढलेल्या किमतीबाबत हॉटेलचालक आणि पर्यटकांमध्ये वाद झाला. एका पर्यटकाने वादाचे व्हिडीओग्राफी केले. त्यानंतर मालकाने सर्वांना खोलीत बंद केले. हॉटेल मालकाचे हे गैरकृत्य उघडकीस आले तेव्हा नेदुमकंदमचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. अखेर त्यांनी प्रकरण मिटवले. यावेळी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन आणि होम स्टे रिसॉर्ट असोसिएशनचे अधिकारीही उपस्थित होते.