नवी दिल्ली – भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १०० कोटी डोसचा टप्पा आज सकाळीच ओलांडला आहे. जगभरातच ही बाब अत्यंत अभिमानाची ठरली आहे. भारतात १६ जानेवारी २०२१ रोजी पहिला डोस देण्यात आला होता. कोरोना लसीकरण हे एक मोठे आव्हान होते. नागरिकांच्या लसीकरणाला खुप वर्षे लागतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अतिशय गतिमान पद्धतीने देशात लसीकरण मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे कोरोना लढ्यात मोठे यश मिळत आहे. पंतप्रधानांनी या मोहिमेच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, सर्व स्तरातून याचे कौतुक होत आहे.
https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1451041051372752896?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1451041051372752896%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Findia%2Fcorona-vaccination-updates-india-crossed-100-crore-dose-mark-records-1008706