आपण आजपर्यंत केवळ कापड फाटताना बघितले असेल. पण, चक्क रस्ता फाटतोय, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. हो, पण हे शंभर टक्के खरे आहे. उत्तराखंडमध्ये गौला नदीवर असलेल्या पुलावर हा अनुभव स्थानिक नागरिकांना आला आहे. एक दुचाकी चालक पुलावर येत होता. मात्र, पुलाला मोठे भगदाड पडले होते आणि ते वाढत असल्याने हा पूल जणू फाटतच असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी या दुचाकी चालकाला इशारा केला. त्याची दखल घेत तो तत्काळ परतला. बघा या घटनेचा अतिशय थरारक व्हिडिओ
#WATCH | Uttarakhand:Locals present at a bridge over Gaula River in Haldwani shout to alert a motorcycle rider who was coming towards their side by crossing the bridge that was getting washed away due to rise in water level. Motorcycle rider turned back & returned to his own side pic.twitter.com/Ps4CB72uU9
— ANI (@ANI) October 19, 2021