नवी दिल्ली – सोनसाखळी चोर असो की मोबाईल चोर त्याच्या कारनाम्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो किंवा गंभीर अपघात होऊ शकतो. सध्या दिल्लीमध्ये मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून अशाच एका चोरट्याने मोबाईल चोरतांना तरुणीला अक्षरशः फरफटत नेले. ही भयानक घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विपिन हा मॉडेल टाऊनमधील गुर मंडी भागातील रहिवासी आहे. विपिन हा मित्राच्या स्कूटरवर मागे बसला होता. त्याने मुलीचा मोबाईल ओढताच पीडित मुलीने विपिनचे जॅकेट हिसकावले होते, त्यामुळे आरोपीने मुलीला सुमारे १०० मीटरपर्यंत ओढले.
https://twitter.com/ANI/status/1471789825426554883?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1471789825426554883%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-35721286672342795952.ampproject.net%2F2112032204000%2Fframe.html
सदर घटना उत्तर-पश्चिम दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात एका ट्रॅफिक सिग्नलवर ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका चोराची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये फ्रंट ऑफिस असिस्टंट म्हणून काम करणारी २३ वर्षीय तरूणी घरी परतत होती. या दुर्घटनेत पायलच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तेथे उपस्थित नागरिकांनी पायलला रुग्णालयात नेले.
स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कमला नगर येथून स्कूटर चोरल्यानंतर तो आणि त्याच्या साथीदारांनी शालिमार बाग गाठून ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका महिलेचा मोबाईल हिसकावून घेतला, असे विपीनने चौकशीत सांगितले. विपिन हा अट्टल गुन्हेगार असून तो ड्रग्ज व्यसनी आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.