साप्ताहिक राशिभविष्य
२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२२
मेष – मदतीसाठी आपला हात पुढे राहील. मात्र सत्पात्री म्हणजेच खऱ्या गरजू व्यक्तीस मदत करावी. रेंगाळलेले शुभकार्य ठरेल किंवा त्या दृष्टीने हालचाली होतील. गुंतवणुकीस चांगला काळ …..
वृषभ – कंबर तसेच पाठीचे दुखणे सांभाळा. टाईम टेबल वर काम करा. फक्त अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कलाकारांसाठी मोठी संधी मिळेल…..
मिथुन – आपले म्हणणे, प्रतिपादन ठाशीव पद्धतीने मांडा. त्यासाठी चपखल अशी उदाहरणे तयार ठेवा. चर्चेवर भर द्या. वाद टाळा. सप्ताहा शेवटी शुभवार्ता…..
कर्क – मित्रमंडळींबरोबर सुखदुःखाच्या गप्पा रंगतील. नूतन वास्तू अथवा वाहन खरेदी करतेवेळी खर्चावर नियंत्रण आवश्यक….
सिंह – स्पष्ट शब्दात आपले मत मांडा, परंतु टोकदार शब्द टाळा. कफाचा त्रास सांभाळा. शब्द संभाळा. तर्कसंगत बोला…..
कन्या – आर्थिक वादात मध्यम मार्ग स्वीकारून समस्येतून बाहेर पडा. ताणून धरल्यास तोटा होईल. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा….
तूळ – परिचित मित्रपरिवार सगेसंबंधी यांच्यासोबतचे वाद शक्य असल्यास मिटवून टाका. नातेसंबंध सांभाळा. हितचिंतकांकडून फायदा होईल…..
वृश्चिक – स्तुती पासून सावध राहा. प्रत्येक ठिकाणी व्यवहारी दृष्टिकोन ठेवू नये. भावनेच्या आहारी जाणे सांभाळावे. आर्थिक व्यवहार बाबत सजगता आवश्यक…
धनु – वादामध्ये तडजोड स्वीकारा. संयमित बोला. रखडलेली कामे आश्चर्यकारकपणे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांबाबत शुभवार्ता मिळेल. कौटुंबिक तब्येत सांभाळा…..
मकर – सार्वजनिकरित्या बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. मान द्या, मान घ्या. महत्त्वाची कागदपत्रे योग्य स्थितीत ठेवा….
कुंभ – गुणवत्तेने स्पर्धा करा. नजिकच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधून निर्णय घ्या. दीर्घकालीन मोठी गुंतवणूक नको. परिचितांकडून शुभवार्ता….
मीन – जबाबदारीचे भान असावे. मालमत्ताविषयक प्रश्न तडजोडीने मार्गी लावा. मोठा आर्थिक व्यवहारात अतिविश्वास तोट्याचा ठरू शकतो. मौल्यवान खरेदी होईल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(वास्तु विजिट साठी वास्तुतज्ञ पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)