साप्ताहिक राशिभविष्य – २५ जुलै ते १ ऑगस्ट
मेष – मोठी खरेदी टाळा. व्यवसायिक मोठा निर्णय चर्चा करून घ्या. तपासणी खर्चाची शक्यता. दीर्घकालीन गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने घ्या….
वृषभ- जुनी येणी वसूल होतील. मागील गुंतवणुकीचा लाभ होईल. परदेश व्यापारात यश. व्यवसायिक मोठा निर्णय होण्याची शक्यता…..
मिथुन – मौखिक आरोग्य सांभाळा. आर्थिक फायदाबाबत वेट अँड वॉच. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त sources तयार करा. मानसन्मान मिळेल…..
कर्क – नव्या व्यावसायिक संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा नको. दिवाणी दावे लाभात राहतील. अति व्यायाम टाळा….
सिंह – सकारात्मक विचार ठेवा. मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात अनपेक्षित प्रगती होईल. बाहेरचे खाणे टाळा. वादाचे प्रसंग टाळा….
कन्या – नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. स्वतःची शारीरिक विशेष काळजी घ्या. कौटुंबिक मतभेद टाळा. वात प्रकृतीची विशेष काळजी घ्या….
तूळ – अहंकार भाव टाळा. विश्वासू व्यक्तींची साथ लाभेल. पुरेशी विश्रांती घ्या. खान पानावर विशेष लक्ष द्या. जुने हितसंबंधी भेटतील…..
वृश्चिक – नोकरीमध्ये बदलीचे योग संभवतात. कायदेशीर कामे वेळेवर करा. ज्येष्ठांचा मिळालेला सल्ला अमलात आणा. ध्यानधारणा प्राणायाम नियमित करा…..
धनु – ताणतणावात पासून लांब रहा. व्यवसायिक आव्हाने स्वीकारा. वास्तु नूतनीकरणाचे प्लॅनिंग होईल. मोठ्या निर्णयबाबत वाद नको. चर्चा करा…..
मकर – नकारात्मकता टाळा. आपला नकारात्मक निर्णय सोप्या पद्धतीने सांगा. कामात विलंब टाळा. बढतीचे योग. डोकेदुखी संभाळा…….
कुंभ- सामंजस्याने समस्या सोडवा. कामाचे योग्य ते प्लॅनिंग करा. जुन्या आप्तस्वकीय यांच्याकडून मदत होईल. हाडासंबंधी आजार काळजी घ्या……..
मीन – धार्मिक उत्सवाचे प्लॅनिंग होईल. अकारण खर्च टाळा. आपले मत दुसऱ्यावर लादू नका. मनासारखा मेनू खायला मिळेल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडे चार ते सहा आहे.