साप्ताहिक राशिभविष्य – 31 जुलै ते 7 ऑगस्ट
मेष – या सप्ताहात मुख्यतः आपण भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीचा रिव्ह्यू घेणे गरजेचे आहे. जी गुंतवणूक फायद्याची नसून उगाच पैसे अडकलेले असतील तर त्वरित पैसे मोकळे करावे…..
वृषभ – या सप्ताहात जुने वाद सांभाळणे आवश्यक आहे. मुख्यतः हे वाद देण्याघेण्या संबंधात असू शकतात. अशावेळी जे काही घेणेदेणे बाकी असेल तो व्यवहार पूर्ण करावा. म्हणजे भविष्यात त्रास होणार नाही…..
मिथुन – या सप्ताहात मुख्यतः महत्त्वाच्या कायदेशीर जबाबदाऱ्या अचानक समोर येऊ शकतात. त्या पार पाडणे अतिशय आवश्यक ठरू शकते. त्याकरता मानसिक व आर्थिक तयारी ठेवावी…..
कर्क – प्रॉपर्टी संबंधातील महत्त्वाची कामे या सप्ताहात पार पाडावी लागतील. त्या संबंधातील महत्त्वाचे कागदपत्रे व्यवस्थित फायलिंग करून ठेवावे….
सिंह – पाठदुखी विषयक अथवा हाडांविषयी तक्रारी या शब्दात उद्भवू शकतात. त्याबाबत अंगावर दुखणे न काढता डॉक्टर उपाय करावे……
कन्या – बरेचदा आपण दिलेला सल्ला आपल्याला त्रासदायक ठरतो. असा एखादा अनुभव या सप्ताहात येऊ नये याची काळजी घ्यावी…..
तूळ – कुकिंग विषयक अथवा एखाद्या मेनू विषयक आपण दिलेली माहिती खूप जणांना उपयुक्त ठरणार आहे. त्याकरता या क्षेत्रात अजून नवीन काय करता येईल असे पहावे…..
वृश्चिक – दोघांचा वाद तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती पुढील सप्ताहामध्ये टाळावी. कुणामध्ये मध्यस्थी करताना पूर्व अनुभव लक्षात ठेवावा…..
धनु – या सप्ताहात मुख्यतः धार्मिक कामे पार पडतील. बाकी असलेले शुभकार्य मार्गी लागेल. सप्ताह अथवा दिंडीत सहभाग राहील….
मकर – वरिष्ठांची मर्जी सांभाळणे. घरातील ज्येष्ठांच्या मतानुसार काम करणे. वरिष्ठांचा सल्ला मानणे. नोकरी अथवा व्यवसायात वरिष्ठांची खफा मर्जी टाळणे. या सप्ताहात करावी लागेल……
कुंभ – नूतन वास्तू विषयक व्यवहार अथवा नूतन प्लॉट विषयक व्यवहार या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. तसे असेल तर वास्तूचे प्रवेशद्वार उत्तर पूर्व ईशान्य भागात पाहावे. प्लॉट असेल तर उत्तर पूर्वे ला रस्ता असलेला निवडावा…….
मीन – नवीन व्यवसाय बाबत चर्चा. नवीन व्यवसायाची जागा ठरवणे. त्याबाबत करार मदार करणे. एकूणच नवीन व्यवसाय संबंधित सर्व तयारी करणे या हप्त्यात होऊ शकते…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)
Horoscope Weekly Rashi Bhavishya 31 July to 7 August 2022