साप्ताहिक राशिभविष्य – ३ ते १० एप्रिल
मेष – कर्तव्यात कसूर होणार नाही, याची काळजी घ्यावी. आहाराचे वेळापत्रक सांभाळावे. अपयश पदरी पडणार नाही. परीक्षेचा काळ….
वृषभ – मोठा आर्थिक व्यवहार टाळा. अपयश येऊ नये म्हणून शांत बुद्धीने विचार करा. परिस्थितीमध्ये नक्की बदल होईल. कर्तृत्वावर विश्वास ठेवा….
मिथुन – प्रतिष्ठीत लोकांचे सहकार्य लाभेल. प्रतिक्रिया सावध शब्दांनी द्यावी. यशप्राप्ती होईल. नातेवाईकांबरोबर मतभेद टाळावे….
कर्क – गुंतागुंतीचा आर्थिक व्यवहार टाळा. अपयशातून स्थिरचित्त राहून मार्ग काढा. स्वतःमध्ये बदल करा म्हणजे परिस्थितीमध्ये बदल होईल….
सिंह – आपल्या शब्दाने वाद वाढणार नाही, याची काळजी घ्या. स्वतःचा अंदाज स्वतः बांधा. आकस्मिक धनलाभ योग. आहाराबाबत काळजी घ्यावी….
कन्या – ऋषितुल्य व्यक्तींचा सल्ला मोलाचा राहील. मालमत्ताविषयक प्रश्न लवकर सुटतील. अनुभवी लोकांच्या गाठीभेटी होतील. प्रगतीचा वेग स्थिर राहील….
तूळ – अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागतील. वादातील भूमिका घेऊ नका. मतभेद सांभाळा वागणे व बोलणे मोजके ठेवा….
वृश्चिक – शॉर्टकट आर्थिक प्रलोभनांपासून लांब राहा. आपला आवाका ओळखून विरोध पत्करा. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. रखडलेली धार्मिक कामे पूर्ण करा….
धनु – पित्ताचा त्रास सांभाळा. आकस्मिक प्रवास खर्च. परिवाराचा सल्ला घ्या. जुना मित्रपरिवार भेटेल…
मकर – गुंतागुंतीचे मतभेद प्रसंग चतुराईने हाताळा. सुसंवादातून मार्ग निघेल. सामाजिक संबंध संभाळा….
कुंभ – रागावर नियंत्रण आवश्यक. योग्य शब्दांचा वापर करा. अकस्मात मोठी आर्थिक जबाबदारी शक्यता…..
मीन – प्रगतीमध्ये मित्र परिवाराचा मोठा सहभाग राहील. नव्या आर्थिक वाटा उपलब्ध होतील. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.