साप्ताहिक राशिभविष्य – 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
मेष – कोणत्याही निर्णयांमध्ये द्विधा मनस्थिती नको. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. मदत कार्यात वाढ करावी. धार्मिक कार्य पार पडेल. आर्थिक घडी नीट बसेल…
वृषभ – फायद्याचे अथवा तोट्याचे याच्यामध्ये गल्लत करू नये. वेळेची योग्य ती गुंतवणूक करावी. भावना आणि व्यवहार यातील HAIRLINE ओळखावी. अति अगत्य टाळावे…
मिथुन – चीत भी मेरी पट भी मेरी, असे नको. फार अपेक्षा ठेवू नये. जुन्या चिंता मिटतील. गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न मिळेल. जास्त भावनाशीलता टाळा….
कर्क – निष्कारण वादात पडू नये. शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पडतील. स्पर्धात्मक सप्ताह योग्य. अयोग्य निर्णय घेताना दीर्घकालीन विचार व्हावा. आर्थिक मदत करण्याबाबत सावधानता…..
सिंह – कौटुंबिक जबाबदारी वाढेल. चिडचिड टाळा. अनपेक्षित सुखद घटना. आर्थिक भार वाढेल. भविष्यकालीन जबाबदारीचा अंदाज घ्या…..
कन्या – घर सजावटीच्या नवीन कल्पना. नवीन मेनू बनेल. छोटी-मोठी नवीन खरेदी होतील. फायदा-तोटा याचा अंदाज घेऊन खर्च करा. मोठा खर्च करण्याआधी विचार करा….
तूळ – अनुभवी व्यक्तींचा सल्ला आवश्यक. स्वतःला शांत ठेवा. आर्थिक मॅनेजमेंट योग्य पद्धतीने करा. अनपेक्षित खर्च टाळा. योग्य तिथे योग्य व्यक्तीचा विचार घ्यावा….
वृश्चिक – शुभवार्ता मिळेल. गरजू व्यक्तींना मदत करा. अनपेक्षित जबाबदारी वाढेल. सहनशक्ती वाढवा. मानसिक आधार मिळेल. वादाच्या प्रसंगापासून लांब राहावे…
धनु – आपला हेका सोडावा. सहकार्य करताना मागील अनुभव लक्षात ठेवावा. परिचितांमध्ये वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी….
मकर – गैरसमजातून कोणतेही मत नको. कामातील एकाग्रता वाढवावी. विनाकारण वाद टाळावे. मानसिक स्वास्थ्य सांभाळावे. शब्दाने शब्द वाढवू नये…..
कुंभ – विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. अनावश्यक खरेदी टाळा. अनपेक्षित मोठे खर्च समोर येतील. पोटाच्या तक्रारी सांभाळा. रेंगाळलेले धार्मिक कार्य पार पाडावे….
मीन – मागील अनुभव व भविष्यकालीन राजकीय निर्णय घ्यावे. बऱ्याच प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा. आळस टाळा. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे

व्हॉटसअॅप – 9373913484