साप्ताहिक राशिभविष्य – 27 मार्च ते 2 एप्रिल
मेष – ध्येय निश्चित करणे आवश्यक. ऐकावे जनाचे करावे मनाचे. एका विषयावर अनेकांचा सल्ला टाळावा. प्राणायाम गरजेचा…..
वृषभ – सार्वजनिक ठिकाणी बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. मान-अपमान विषय न ठेवता योग्य तेच बोला. शुभवार्ता कळेल…..
मिथुन – वास्तविकता स्वीकारल्यास परिस्थिती स्वीकारणे सोपे होईल. नवीन प्लॉट अथवा फ्लॅट खरेदीबाबत चर्चा. हाडांचे दुखणे सांभाळा…..
कर्क – मोठा आर्थिक व्यवहार चांगल्या मध्यस्थाने करा. धार्मिक विधी योग्य कालावधीत पूर्ण करा. व्यवसाय तसेच नोकरदारांना शुभवार्ता…..
सिंह – मोठी व महत्त्वपूर्ण खरेदी होईल. महत्वाचे दस्तऐवज जपून ठेवा. भावनिक राहून व्यावहारिक निर्णय घेऊ नये…..
कन्या – विरोधकांचा शाब्दिक हल्ला मुद्देसूद परतावून लावा. पचनक्रिया संबंधातील तक्रारी योग्य वेळी दूर करा. आर्थिकपेक्षा गुणवत्तेने स्पर्धा करा….
तूळ – जुन्या मित्र परिवाराशी गप्पा रंगतील. वादग्रस्त विषय टाळावे. डोळ्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको….
वृश्चिक – उच्चपदस्थांची मॅनेजमेंट सांभाळताना तारेवरची कसरत होईल. आपुलकीच्या व्यक्तींशी संबंध जपा. मनासारखा दानधर्म होईल. जुने गुंतागुंतीचे व्यवहार तडजोडीनेच मार्गी लागतील….
धनु – नातेसंबंधांमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार संभाळा. कौटुंबिक आरोग्य जपा. पित्त प्रकृती सांभाळा. अचानक उद्भवणारे खर्च सांभाळा…..
मकर – राजकीय तसेच सामाजिक जीवनात शुभवार्ता मिळेल. नियमित योगा, प्राणायाम गरजेचा. मोठा व्यावसायिक निर्णय होईल….
कुंभ – नातेवाईकांमध्ये मध्यस्थी जरा जपूनच. विवाह इच्छुकांचे कार्य ठरतील. कुलदैवताला जाणे घडेल…..
मीन – परदेशगमन योग. नवीन मोठ्या संधी उपलब्ध होतील. व्यवसायिक आर्थिक गरजा पूर्ण होतील….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484