साप्ताहिक राशिभविष्य – २६ जून ते २ जुलै २०२२
मेष – जुने आर्थिक अनुभव कामी येतील. कुटुंबातील सदस्यांची मर्जी सांभाळा. मोठा आर्थिक निर्णय होईल. व्यवसायात किरकोळ बदल संभवतो…..
वृषभ – एकतर्फी विचार करू नये. भावनिक गुंतागुंत सांभाळा. कर्ज विषयक प्रकरणे सांभाळा. जुनी गुंतवणुक फायद्याची ठरेल…..
मिथुन – आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडा. किरकोळ विषयावर वाद टाळा. गैरसमज करून घेऊ नये. लहानग्यांचे आरोग्य सांभाळा…..
कर्क – गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार करू नये. नवीन व्यवसाय अनोळखी व्यक्तीबरोबर भागीदारी नको. त्वरित मोठे आर्थिक निर्णय येऊ नये……
सिंह – वात विकार संभाळा. अति विश्वास ठेवू नये. प्रयत्नात सातत्य हवे. मध्यम मार्ग स्वीकारून समस्या सोडवा…..
कन्या – एका दृष्टीने समस्येकडे पाहू नये. समस्या सोडवणे सोबतच ती वाढू नये याची काळजी घ्या. ऐकावे जनाचे करावे मनाचे…..
तूळ – आरोग्यविषयक आर्थिक तरतूद करणे आवश्यक. प्रयत्नात सातत्य हवे. फायदा होत नसल्यास अन्य कार्यात श्रम घ्यावे……
वृश्चिक – अती ताणून धरल्यास मोठा आर्थिक व्यवहार फिस्कटेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला समस्येतून बाहेर काढेल. वैचारिक गोंधळ टाळा…..
धनु – जास्त ऐका, कमी बोला. कौटुंबिक वाद वाढू देऊ नये. अति अपेक्षा टाळा. प्रासंगिक प्रलोभनांना बळी पडू नये…..
मकर – अतिविचार टाळा. आपले हितचिंतक ओळखा. उत्तर देण्यासाठी योग्य वेळेची वाट पहा. छोटा नकारात्मक प्रसंगांचा विचार नको…..
कुंभ – जुने स्थावर गुंतवणूक फायद्याची ठरेल. वेळापत्रक संभाळा. आहार-विहार संभाळा…..
मीन – इच्छुकांचे विवाह ठरतील. व्यावहारिक पातळीवर निर्णय घ्या. अती भावनिकता टाळा. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)