साप्ताहिक राशिभविष्य – २४ ते ३१ ऑक्टोबर
मेष – जुन्या व्यवहारातील येणी मिळतील. नवीन व्यवसायात यश. परिचितांच्या गाठीभेटी होतील. मोठे व्यवहार सांभाळून करा….
वृषभ – चौफेर प्रगतीच्या संधी. एकाग्रता आवश्यक. अनावश्यक खर्च सांभाळा. महत्त्वाची कागदपत्रे व वस्तू सांभाळा….
मिथुन – नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्य सफल होतील. बच्चेकंपनीचा हट्ट पुरवता नाकी नऊ होईल….
कर्क – व्यवसायात नवीन संकल्पना राबवा. प्रवास योग. किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक सुसंवाद आवश्यक…..
सिंह – अल्पकालीन गुंतवणूक फायद्याची. व्यवसाय, नवीन संकल्पना राबवणे आवश्यक. मोठा निर्णय चर्चेतून घ्या…..
कन्या – महत्वाचे प्रश्न सुटल्याने मानसिक प्रसन्नता जाणवेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. पित्ताचा त्रास सांभाळा. खानपान सांभाळा….
तूळ – मध्यस्ती टाळा. नवीन जबाबदारी पूर्ण विचाराअंती घ्या. कौटुंबिक जुने वाद वाढवू नयेत. ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या….
वृश्चिक – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. महत्वाचे प्रश्न सुटतील. आर्थिक चणचण संपेल. उधार उसनवार सांभाळा…..
धनु – मोठी गुंतवणूक टाळा. आत्मविश्वासपूर्ण जबाबदारी घ्या. आरोग्य विषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा…..
मकर – लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको. रागावर नियंत्रण असावे. आपण बरे, आपले काम बरे असे ठेवा….
कुंभ – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात मोठी उलाढाल टाळा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार नको…..
मीन – नवीन व्यवसायासाठी अनुकूल काळ. टीका सकारात्मक स्वीकारा. वादविवाद टाळा. शंकास्पद व्यवहार करू नये…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484
शंका समाधान
प्रश्न – श्री संदीप- पुष्कराज रत्नाबद्दल माहिती द्यावी.
उत्तर – आजकाल बरेच जण पुष्कराज अंगठी वापरतात. पुष्कराज रत्न वापरण्याआधी काही माहिती घेणे आवश्यक आहे. पुष्कराज मध्ये चार प्रकारचे रत्न सांगितल्या जातात.
पिवळा हकीक- हा पुष्कराज म्हणून बरेच जण वापरतात….
तोपाज – हे रत्न देखील पुष्कराज म्हणून अनेक जण वापरतात.
बँकोक पुष्कराज – हा अतिशय पिवळसर रंगाचा पुष्कराज असतो..
सिलोन पुष्कराज – तुलनेने सर्वात महाग सर्वाधिक मागणी असलेला हलक्या पिवळसर रंगाचा चकचकीत आरपार स्वच्छ लस्टर असणारा…..
कुंडलीतील गुरू ग्रह राहू-केतू अथवा शनि युक्त असल्यास, अथवा कुंडलीतील गुरु ग्रह षष्ठम अष्टम, अथवा द्वादश भावात असल्यास, अथवा आपल्या राशीला गुरुबळ नसल्यास, अथवा हातावरील गुरु उंचवट्यावर जाळीदार चिन्ह असल्यास, गुरु बोटा वरील तिन्ही पेरावर जाळी असल्यास, पुष्कराज रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो….
तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न वापरू नये.