साप्ताहिक राशिभविष्य – 23 ते 30 जानेवारी
मेष – मनाला शांत ठेवा. समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्या. वाद होणार नाही याची काळजी घ्या. कौटुंबिक गेट-टुगेदर होईल…
वृषभ – पैसे मिळवण्याचा शॉर्टकट मार्ग टाळा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लागेल. दूरचा प्रवास टाळा. हाडांचे दुखणे सांभाळा…
मिथुन – व्यवसायात अपेक्षित अर्थ लाभ होईल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये. नवीन क्षेत्रात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या….
कर्क – वरिष्ठांची नाराजी सांभाळा. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. आर्थिक ताळमेळ विचारपूर्वक बसवा. ज्येष्ठांची तब्येत सांभाळा …..
सिंह – प्रियजनांचा सहवास लाभेल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. फायद्याचा आर्थिक व्यवहार होईल….
कन्या – शत्रूच्या हालचालीवर लक्ष असू द्या. प्रतिस्पर्ध्यांना कोणती संधी देऊ नये. दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची. पित्ताचा त्रास संभवतो….
तूळ – व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक वाद सांभाळा. मोठा आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करा. प्रवास संभवतो ….
वृश्चिक – आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. ध्येयावरून हटू नये. फायदा नसणार्या संकल्पनेवर वेळ वाया घालवू नये. आहार-विहार सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा…
धनु – व्यवसायाच्या नवीन संकल्पनांवर काम सुरू करा. अनुभवी लोकांची मते विचारात घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक पूर्ण विचारांती करा. तात्काळ मतप्रदर्शन टाळा…
मकर – सामाजिक क्षेत्रात तोल मोल के बोल. बुद्धी क्षमतेच्या आधारावर यशप्राप्ती होईल. अपेक्षित खर्च सांभाळा. मानसिक ओढाताण होणार नाही, याची काळजी घ्या….
कुंभ – नकारात्मक विचार टाळा. कार्यमग्न रहा. आपल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठांचा सहवास मिळेल. परिश्रमाचे चीज होईल…
मीन – प्रगतिशील सप्ताह. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. कला क्षेत्रातील मंडळींना नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळेल. सहकाऱ्यांची मदत होईल………..
शंका समाधान
प्रश्न – श्री. गौरव- कोणतेही रत्न धारण करताना कोणती काळजी घ्यावी?
उत्तर- आपल्या मनाप्रमाणे रत्न वापरू नये. घरात पडलेले जुने रत्न वापरू नये. दुसऱ्याने वापरलेले रत्न आपण वापरू नये. फक्त राशिवरून रत्न वापरू नये. रस्त्यामध्ये सापडलेले, तुटलेले, तडा गेलेले रत्न वापरू नये. प्रमाणापेक्षा मोठ्या कॅरेटचे रत्न त्याचप्रमाणे योग्य त्या धातूत रत्न वापरावे. आपणास सुचवलेल्या बोटा मध्येच रत्न धारण करावे. अंगठी अथवा पेंडंट जास्त दिवस काढून ठेवू नये. दुसऱ्याला वापरण्यास देऊ नये. अंगठीतील अथवा पेंडंट मधील रत्न निखळून पडल्यास पुन्हा तेच रत्न वापरू नये. रत्न वापरताना शक्यतो कुंडली, हस्तरेषा, वास्तुरचना, याचा आधार घ्यावा. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न अथवा उपरत्न वापरू नये. तज्ज्ञांनी सांगितलेल्या काळापर्यंत रत्न वापरावे……
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.