साप्ताहिक राशिभविष्य – २२ ते २९ ऑगस्ट
मेष – आर्थिक मानसिक शारीरिक स्वास्थ्य त्रिकोण सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. अर्जंट व इम्पॉर्टंट कामे यात फरक करा…..
वृषभ – फक्त ऐकलेल्या बाबींवर गैरसमज नको. धारदार बोलण्यापेक्षा सौम्य शब्दात काम साधा. विश्वासू व्यक्तींवरच आर्थिक दारोमदार ठेवा…..
मिथुन – उत्तम श्रोते बना. टीका टाळा. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कौटुंबिक सुसंवाद ठेवा…..
कर्क – वात प्रकोप काळजी घ्या. अति व्यावहारिक दृष्टिकोन नको. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, असे नाही. मानसिक स्वास्थ्य सांभाळा…….
सिंह – गरजेपेक्षा अधिक मेहनत टाळा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. आहार-विहाराकडे विशेष लक्ष द्या. पिका खिलाडूवृत्तीने स्वीकारा……
कन्या – रागावर नियंत्रण ठेवा. तोल मोल के बोल. मेहनतीला योग्य यश मिळेल. परिचितांशी चांगले संबंध ठेवा……
तूळ – कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. सल्ला जरा जपूनच द्या. मोठा प्रवास संभवतो. स्वतःला सिद्ध करण्याची संधी. शब्द जपून वापरा…….
वृश्चिक – आर्थिक इच्छापूर्ती होईल. सोपवलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडाल. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे. मनाची चलबिचल नको……
धनु – गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे. स्वयंशिस्त आवश्यक. व्यक्तिगत देवाण-घेवाण सांभाळा……..
मकर – अधिक कार्यक्षम व्हावे लागेल. मोजके बोलून कार्यभाग साधा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल. सार्वजनिक कामात यशस्वी व्हाल…….
कुंभ – अडचणींवर संयमाने मात करा. मित्रमंडळींकडून योग्य ते सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. सर्व प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करा…..
मीन – वेळेचा पुरेपूर वापर आवश्यक. योग्य आर्थिक नियोजन करा. उधार उसनवार सांभाळा. व्यावसायिक यशासाठी अधिक परिश्रम गरजेचे………..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.