साप्ताहिक राशिभविष्य – 19 ते 26 जून
मेष – गरजूंना मदत होईल, मात्र सत्पात्री दान असावे. शुभकार्य ठरेल, त्या दृष्टीने हालचाली होतील. गुंतवणुकीस योग्य सप्ताह…..
वृषभ – हाडांचे दुखणे सांभाळा. निश्चित ध्येयावर काम करा. अनुभव नसलेला सल्लागार नेमू नका. कलाकारांसाठी शुभवार्ता मिळेल…..
मिथुन – आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडा. त्यासाठी विविध उदाहरणे तयार ठेवा. चर्चा करा. वाद नको. सप्ताह शेवटी आर्थिक शुभवार्ता…..
कर्क – जुन्या मित्रमंडळींबरोबर सुखदुःखाच्या गप्पा रंगतील. नूतन वास्तू अथवा वाहन खरेदी योग. खर्चावर नियंत्रण आवश्यक….
सिंह – स्पष्ट शब्दात आपले मत मांडा. धरसोड वृत्ती नको. कफाचा त्रास सांभाळा. शब्द पाळा. तर्कसंगत बोला…..
कन्या – आर्थिक तडजोड स्वीकारा. मध्यम मार्ग स्वीकारून समस्येतून बाहेर पडा. मुद्दा ताणून धरल्यास तोटा होईल. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा….
तूळ – सगे संबंधी यांच्यासोबतचे वाद मिटवून टाका. नातेसंबंध सांभाळा. किरकोळ बाबींवरचे वाद नको. हितचिंतकांकडून फायदा होईल….
वृश्चिक – स्तुती पाठक यापासून सावध राहा. व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. भावनेच्या आहारी जाऊ नये. आर्थिक व्यवहार सावधपणे करा…
धनु – फायद्यासाठी तत्त्वांमध्ये तडजोड नको. संयम आवश्यक. रखडलेली कामे पूर्ण होतील. बदलीचे योग. लहान मुलांची तब्येत सांभाळा…..
मकर – चार चौघात बोलताना योग्य शब्दांचा वापर करा. अपमान होईल असे बोलू नये. आदर द्यावा, आदर घ्यावा….
कुंभ – बोलण्यापेक्षा गुणवत्तेने स्पर्धा करा. नजिकच्या अंदाज बांधून निर्णय घ्या. सध्या दीर्घकालीन गुंतवणूक नको. विद्यार्थ्यांसाठी शुभवार्ता….
मीन – जबाबदारी स्वीकारण्याकडे कल ठेवा. मालमत्ताविषयक प्रश्न मार्गी लागतील. मोठा आर्थिक व्यवहारात अतिविश्वास टाळा. मूल्यवान खरेदी होईल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(वास्तु विजिट साठी वास्तुतज्ञ पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)