साप्ताहिक राशिभविष्य – 19 ते 26 डिसेंबर
मेष – कार्य किर्ती पसरेल. त्यातून कार्य गौरव होईल. जुने सहकारी जपा. अपेक्षित व्यवसायिक संधीतून अर्थप्राप्ती.
वृषभ – व्यवसायिक समस्या मिळतील. अनुभवी व्यक्तींचे सहकार्य लाभेल. अनोळखी व्यक्तींशी अति परिचय टाळा.
मिथुन – मोठ्या निर्णयात सल्लामसलत गरजेची. गैरसमजातून वाद विकोपाला जाऊ देऊ नये. अनपेक्षित अर्थलाभ. कर्ज प्रकरण सांभाळा.
कर्क – शुभकार्य ठरेल. सामाजिक क्षेत्रात वलयांकित वातावरण. वास्तुविषयक व्यवहार यशस्वी ठरतील. अनपेक्षित मोठी खरेदी
सिंह – कौटुंबिक, शारीरिक समस्या. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. विद्युत उपकरण पासून सांभाळा. मध्यस्थी फलद्रूप होईल
कन्या – मौल्यवान वस्तू जपा. कागदपत्रे संभाळा. नवीन व्यक्तींची आर्थिक व्यवहार नको. मोठे आर्थिक व्यवहार सांभाळा
तूळ – चांगल्या अर्थप्राप्तीसाठी शॉर्टकट नको. सुवार्ता मिळेल. प्रदर्शन उत्सवात सहभाग. लांबचा प्रवास टाळा.
वृश्चिक – इच्छापूर्ती होईल. जनसंपर्क सांभाळून वाढवा. भावनिक बाबीतून त्रास. कायदेशीर बाबी सांभाळा.
धनु – आर्थिक कोंडी करणारा सप्ताह. व्यवसायिक वसुलीवर लक्ष द्या. मानसिक आरोग्य सांभाळा. जुने वाहन खरेदी टाळा
मकर – वाहन सांभाळून चालवा. वास्तव विषयक समस्या जाणवू शकतात. आर्थिक प्राप्ती मर्यादित राहील. नोकरदार यांनी गैरसमज सांभाळा
कुंभ – आर्थिक प्राप्ती साठी अनेक पर्याय उपलब्ध. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. जुन्या गुंतवणुकीचे लाभ मिळेल. जागेचे प्रश्न सुटतील
मीन – तब्येतीची काळजी घ्या. व्यावसायिकांसाठी शुभ काळ. भागीदारी व्यवहार सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे