साप्ताहिक राशिभविष्य १८ ते २५ जुलै
मेष – व्यवसायाच्या नवीन संकल्पनांवर काम सुरू करा. अनुभवी लोकांची मते विचारात घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक पूर्ण विचारांती करा. तत्काळ मतप्रदर्शन टाळा……
वृषभ – सामाजिक क्षेत्रात तोल मोल के बोल. बौद्धिक क्षमतेच्या आधारावर यशप्राप्ती होईल. अनपेक्षित खर्च सांभाळा. मानसिक ओढाताण होणार नाही, याची काळजी घ्या……
मिथुन – नकारात्मक विचार टाळा. कार्यमग्न रहा. आपल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठांची शाबासकी मिळेल. परिश्रमाचे चीज होईल…..
कर्क – प्रगतीशील सप्ताह. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. कला क्षेत्रातील मंडळींना नवनवे प्रयोग करण्याची संधी. सहकाऱ्यांची मदत होईल…..
सिंह- व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचतील. कौटुंबिक वाद संभाळा. मोठा आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. प्रवास संभवतो…….
कन्या – आपण भले आपले काम भले, असे ठेवा. फायदा नसणाऱ्या संकल्पनेवर वेळ घालू नये. आहार-विहार सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा……
तूळ – हितशत्रूंच्या हालचालींवर लक्ष असू द्या. प्रतिस्पर्ध्यांना कोणती संधी देऊ नये. दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची. पित्ताचा त्रास संभवतो…….
वृश्चिक – प्रियजनांचा सहवास लाभेल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. फायद्याचा आर्थिक व्यवहार होईल…..
धनु – वरिष्ठांची नाराजी सांभाळा. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. आर्थिक ताळमेळ विचारपूर्वक बसवा. ज्येष्ठांची तब्येत सांभाळा……
मकर – व्यवसायात अपेक्षित अर्थलाभ होईल. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नये. नवीन क्षेत्रात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्या…..
कुंभ – स्वतःला शांत ठेवा. समोरच्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्या. वाद होणार नाही, याची काळजी घ्या. कौटुंबिक गेट-टुगेदर होईल…..
मीन – पैसे मिळवण्याचा शॉर्टकट मार्ग टाळा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. दूरचा प्रवास टाळा. हाडांचे दुखणे सांभाळा……….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.