साप्ताहिक राशिभविष्य – 17 ते 24 जुलै
मेष – या सप्ताहात कोणावरही विसंबून राहणे टाळा. झटपट होईल असे वाटणारे मोठे व्यवहार शक्यतो तज्ञांच्या सल्ल्याने करा….
वृषभ – या सप्ताहात महत्त्वाचे व अतिशय जिव्हाळ्याचे निर्णय घेण्याचा प्रसंग येऊ शकतो, अशावेळी डगमगून न जाता मागील अनुभव लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा….
मिथुन – या सप्ताहात मुख्यत: नातेवाईक तसेच मित्रपरिवार, हितचिंतक यांच्याशी अपरिहार्य कारणामुळे कटूता येण्याचा संभव आहे. असा प्रसंग वेळीच ओळखून योग्य प्रकारे हाताळावा…..
कर्क – हा सप्ताह तब्येतीसाठी थोडासा त्रासदायक असू शकतो. प्रामुख्याने हाडांसंबंधातील दुखणे याकडे दुर्लक्ष करू नये….
सिंह – या सप्ताहात धार्मिक विधी, शुभकार्य ठरवण्याबाबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. अशावेळी शक्यतो लांबलेल्या धार्मिक विधी व कुलदेवता संबंधातील कार्य करून घ्यावे…..
कन्या – या सप्ताहात आपल्या कृती अथवा शब्दांमुळे मोठा गैरसमज होणे संभव आहे. त्याचे दुर्गामी परिणाम असू शकतात. त्यामुळे तोल मोलके बोल…..
तूळ – या सप्ताहात अति भावनिकता दाखवल्याने अथवा अयोग्य व्यक्तीला मदत केल्याने मनस्ताप होऊ शकतो. आपला वेळ व पैसा वाया जाणार नाही, अशा होतकरू व्यक्तीलाच मदत करावी……
वृश्चिक – राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा सप्ताह अतिशय महत्त्वाचा आहे. पुढील राजकीय अथवा सामाजिक प्रवासासाठी या सप्ताहात योग्य त्या व्यक्तींसोबत राहणे गरजेचे आहे…..
धनु – या सप्ताहात प्रामुख्याने व्यवसाय वाढ अथवा बदल किंवा नोकरी बदल याबाबत निर्णय घेण्याचा प्रसंग येऊ शकतो. अशावेळी पूर्ण विचारांती भविष्यकालीन विचार करून निर्णय घ्यावा…..
मकर – या सप्ताहात मुख्यतः जुने वाद, जुने तंटे मिटवून पुनश्च संबंधित नातेवाईक, परिचित अथवा मित्र यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी येईल. ती साधावी…..
कुंभ – या शब्दात प्रामुख्याने कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळेल. ज्यांनी आपल्यासाठी विविध प्रकारे मदत केली आहे अशा व्यक्ती प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची संधी साधावी….
मीन – या सप्ताहात प्रामुख्याने नोकरी अथवा व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. अशावेळी अशी संधी ज्यांच्यामुळे मिळणार आहे त्यांचे सखोल मार्गदर्शन घ्यावे…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)