साप्ताहिक राशिभविष्य – 15 ते 22 ऑगस्ट
मेष – नवीन खरेदीसाठी अनुकूल काळ. टीका सकारात्मकरीत्या स्वीकारा. वादविवाद टाळा. शंकास्पद व्यवहार करू नये……
वृषभ – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात मोठी उलाढाल टाळा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार नको…..
मिथुन – लांब पल्ल्याचा प्रवास करू नये. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको. रागावर नियंत्रण हवे. आपण बरे, आपले काम बरे असे ठेवा…..
कर्क – मोठी गुंतवणूक टाळा. आत्मविश्वास पूर्ण जबाबदारी घ्या. आरोग्य विषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा…..
सिंह – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. रंग आलेले महत्त्वाचे प्रश्न सुटतील. आर्थिक चणचण संपेल. उधार, उसनवार सांभाळा……
कन्या – मध्यस्ती टाळा. नवीन जबाबदारी पूर्ण विचारांती घ्या. कौटुंबिक जुने वाद वाढवू नयेत. ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या……
तूळ – अल्पकालीन गुंतवणूक फायद्याची. व्यवसाय नवीन संकल्पना राबवणे आवश्यक. मोठा निर्णय चर्चेतून घ्या…..
वृश्चिक – महत्वाचे प्रश्न सुटल्याने मानसिक प्रसन्नता जाणवेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. पित्ताचा त्रास सांभाळा. खानपान सांभाळा…..
धनु – नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्य सफल होतील. बच्चे कंपनीचा हट्ट पुरवता नाकीनऊ होईल…..
मकर – व्यवसायात नवीन संकल्पना राबवा. प्रवास योग. किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक सुसंवाद आवश्यक…..
कुंभ – जुन्या व्यवहारातील येणी मिळतील. नवीन व्यवसायात यश. परिचितांच्या गाठीभेटी होतील……
मीन – चौफेर प्रगतीच्या संधी. एकाग्रता आवश्यक. अनावश्यक खर्च सांभाळा. महत्त्वाची कागदपत्रे व वस्तू सांभाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.