साप्ताहिक राशिभविष्य – 13 ते 20 मार्च…
मेष – आपले प्रयत्न कमी पडणार नाही, याची काळजी घ्या. नवीन परिचित व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. मोठा आर्थिक व्यवहार या सप्ताहात टाळा…..
वृषभ – नेमक्या शब्दात बोला. आपले व परके यातील फरक वेळीच ओळखा. संकटाला धैर्याने सामोरे जा….
मिथुन – पूर्वनियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक बाजू सांभाळताना तारेवरची कसरत होईल. आयत्या वेळच्या समस्यांना तार्किकरित्या सांभाळा…..
कर्क – भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नये. मोठ्या व्यावसायिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा…..
सिंह – मुद्देसूद बोलून विरोधकांचा शाब्दिक हल्ला परतवून लावा. अभ्यासपूर्ण व्यक्त व्हा. योग्य वेळी संयम बाळगा…..
कन्या – उत्साहाला आवर घाला. महत्त्वाचा निर्णयाप्रसंगी सर्व सहकार्यांना सोबत घ्या. सामूहिक यश मिळेल….
तूळ – आक्रमक भूमिका टाळा. प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी. नवीन संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून लांब राहावे…..
वृश्चिक – महत्त्वाच्या कागदपत्रांची शहानिशा करावी. तडजोड केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. धार्मिक प्रतिष्ठित व्यक्तींचा सल्ला घ्यावा…..
धनु – कौटुंबिक समस्यांचा चर्चेतून निवाडा करा. आर्थिक आवक पाहून खरेदीचा निर्णय घ्या. तात्काळ मतप्रदर्शन टाळा….
मकर – पूर्वानुभवातून समस्येतून मार्ग काढा. मूल्यवान वस्तू सांभाळा. बाहेरच्या पेक्षा स्वकियांपासून धडा घ्या…
कुंभ – ये रे माझ्या मागल्या अवस्था टाळावी. गुप्त चर्चा सार्वजनिक करू नये. गैरसमज होईल असे वागू नये….
मीन – गुरुतुल्य व्यक्तिमत्वाची भेट होईल. आर्थिक मोठा व्यवहार सध्या टाळा. वाहन खरेदी, वस्तू खरेदी निर्णय होईल….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे