साप्ताहिक राशीभविष्य – १२ ते १९ सप्टेंबर
मेष – जबाबदारीचे भान असावे. प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवावी. अनावश्यक जनसंपर्क टाळावा. पूर्वानुभव उपयोगी येईल…
वृषभ – बढतीचे योग. मानसिक स्थिती सांभाळा. जुने परिचित भेटतील. नवीन कार्यक्षेत्रात वाव. व्यवसायात नवीन प्रयोग होतील…..
मिथुन – जवळच्या व्यक्तींबाबत चिंता. एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे. तणाव नियंत्रण आवश्यक. ध्यानधारणा, प्राणायाम यावर लक्ष द्यावे…..
कर्क – अनामिक हुरहुर. जोमाने काम करण्यास उत्तम काळ. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठांची मर्जी राहील. भागीदारी व्यवसायात यश…….
सिंह – अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क रहाणे. आवश्यक एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. साऱ्या शैलीमध्ये सकारात्मक बदल आवश्यक. अपेक्षित प्रगती होईल….
कन्या- व्यवसायिक आर्थिक व्यवहार सांभाळा. किरकोळ आर्थिक समस्या जाणवतील. समस्यांवर विविध पर्यायांचा विचार करून ठेवा. सकारात्मकता आवश्यक. दगदग टाळा…..
तूळ – गैरसमज टाळा. सिझनल व्यवसाय व त्यांचे पर्याय यावर विचार करून ठेवा. गोड बोलण्याने काम होणार नाही. प्रत्यक्ष व्यवहारी कृती आवश्यक. बोलताना अचूक शब्द वापरा…..
वृश्चिक – गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहार नको. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघू नये. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ. प्रयत्नात सातत्य आवश्यक. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा….
धनु – सामाजिक परिचयाचा फायदा होईल. कामाच्या वेळापत्रकात प्लॅनिंग व कृती याचा मेळ ठेवा. व्यवसायात सकारात्मक सातत्य आवश्यक. जवळच्या व्यक्तींशी वाद टाळा….
मकर – वाटाघाटीत यश. सहकाऱ्यांच्या साथीने टार्गेट पूर्ण होईल. गैरसमज टाळा. शिस्तबद्ध प्लॅनिंग आवश्यक….
कुंभ – अनपेक्षित अर्थलाभ कामाचा. अभ्यासपूर्ण प्लॅनिंग करा. आर्थिक ताणतणाव. कौटुंबिक नात्यांमध्ये येऊ देऊ नये. चांगल्या कामासाठी पाठपुरावा आवश्यक….
मीन – एकाग्रता आवश्यक. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवा. पूर्वानुभव वापरून समस्या सोडवा. उत्पन्नाचा विविध पर्यायांचा विचार करा….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.