साप्ताहिक राशिभविष्य – 12 ते 19 जून
मेष – मोठे आर्थिक व्यवहार अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय करू नये. कौटुंबिक चर्चेतून निर्णय घ्यावा. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा….
वृषभ – सामाजिक भूमिका जबाबदारीने पार पाडा. विश्वासू व्यक्तींवर अविश्वास दाखवू नये. गैरसमज होईल, असे वागू नये. वाद टाळा…..
मिथुन – आपण दिलेला सल्ला मोलाचा राहील. शैक्षणिक शुभवार्ता मिळेल. मोठा आर्थिक व्यवहार मार्गी लागेल. मध्यममार्गी भूमिका ठेवा…..
कर्क – नातेसंबंध जपा. संदिग्ध भूमिका टाळा. बाळ गोपाळ मध्ये रमाल. महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी होईल. महत्त्वाची कागदपत्रे जपा….
सिंह – स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घ्या. शक्यतो अवलंबून राहू नका. आपली भूमिका योग्य शब्दात पटवून द्या. शुभवार्ता मिळेल…..
कन्या – अति चिकित्सा, अति शंका यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता आणू नये. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. परिचित व्यक्तींसोबतच भागीदारी व्यवसाय करा…..
तूळ – मनासारख्या घडामोडी घडतील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. वास्तु विषयक समस्या सुटतील. वाटाघाटी विचारपूर्वक करा…..
वृश्चिक – मोठे व्यवहार मार्गी लागतील. तर्कसंगत निर्णय घ्या. आपल्या निर्णयाने नातेसंबंध, हितसंबंध अथवा व्यावसायिक संबंध यामध्ये बाधा येणार नाही याची काळजी घ्या. अपेक्षित अर्थप्राप्ती साठी तारेवरची कसरत…..
धनु – प्रमोशनचे योग. मतभेदाचे प्रसंग टाळा. आपले म्हणणे फक्त मांडा, पटवून द्यायचा अट्टाहास नको. घरातील लहानांचे आरोग्य सांभाळा…..
मकर – अपेक्षित संधी प्राप्त होईल. सकारात्मक राहा. प्रतिक्रियेसाठी योग्य शब्दांचा वापर करा. शैक्षणिक शुभवार्ता मिळेल…..
कुंभ – व्यवसायिक जबाबदारी ओळखून मोठे निर्णय घ्या. नोकरदारांना प्रमोशनचे योग. वेळेचा योग्य उपयोग करा. योग्य त्या व्यक्तींनाच वेळ द्या……
मीन – पित्त विकार संभाळा. वाहन सांभाळून चालवा. आर्थिक सुवार्ता मिळेल. महत्वाच्या कामासाठी योग्य प्लॅनिंग हवे……
आजचा राहू काळ दुपारी साडेचार ते सहा आहे. (व्यक्तिगत सल्ल्यासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)