साप्ताहिक राशिभविष्य – १० ते १७ ऑक्टोबर
मेष – संमिश्र अनुभवांचा सप्ताह. अनपेक्षित सुखद वार्ता. शब्द व क्रोधावर संयम हवा. विचारपूर्वक आश्वासन द्यावं. आर्थिकदृष्ट्या संमिश्र अनुभव. तब्येतीकडे दुर्लक्ष नको
वृषभ – सामाजिक कार्य. व्यक्तिगत खर्चावर नियंत्रण ठेवा. बुद्धी व भावना यातील समतोल याचा फायदा होईल. व्यापार वृद्धी व आर्थिक उलाढाल वाढेल. जोडीदाराच्या भावना जपा. शक्ती पेक्षा युक्तीने काम साधा.
मिथुन – छोट्या वादाकडे दुर्लक्ष करा. नवे करार मदार होतील. अतिउत्साह त्रासदायक. परिश्रमाचे चीज होईल. अपत्यांकडून सुखद वार्ता. कौटुंबिक तामिळ जमेल.
कर्क – कौटुंबिक कुरबुरी वाढू देऊ नये. प्रत्येकाला स्पेस द्यावी. प्लॅनिंगचा अतिरेक नको. कृतीवर भर द्यावा. मोठी खरेदी विचारपूर्वक करा. गुंतवणूक अनुभवी सल्ल्याने करा.
सिंह – घाईगडबडीत मोठा निर्णय नको. कुटुंबातील सर्व सदस्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष नको. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. भागीदारी व्यवसाय सांभाळून करा
कन्या – यशप्राप्तीसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रयत्न गरजेचे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू नये. नाहक मनस्ताप होईल, असे कृत्य टाळावे. गृह कर्तव्य बाबत अधिक दक्ष राहावे लागेल
तूळ – यशाने हुरळून जाऊ नये. आपल्या कामावर लक्ष ठेवा. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढू शकतात. वरिष्ठांचे मने जिंकण्यास अधिक प्रयत्न करणे गरजेचे. संयम ठेवावा
वृश्चिक – योग्य तेवढेच परिश्रम करणे. उत्तरार्धात आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होईल. महत्त्वाच्या बाबतीत विश्वास व्यक्तींचा अंदाज घ्या. कर्तव्य आणि जबाबदारी याचे भान असावे
धनु – जवळच्या माणसांबद्दल गैरसमज करून घेऊ नये. शारीरिक अस्वास्थ्यामुळे दैनंदिन टाईम टेबल सांभाळावे. अतिआत्मविश्वास नको. नोकरी, व्यवसायात उत्तम संधी चालून येतील
मकर – विरोधकांच्या कारवायांपासून सावध राहा. शब्द पाळण्यात अडचणी येतील, त्याबाबत सावध राहा. प्रसंगावधान आवश्यक. नोकरी, व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या मिळतील
कुंभ – आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवा. कलाकारांना वाव मिळेल. निमित्त प्रवास संभवतो. तत्त्वाने वागलात तर मनस्ताप कळेल
मीन – आर्थिक सावधगिरी बाळगा. इतरांची मते ऐकून घ्या. आपली भूमिका लादू नका. मित्रपरिवारात शब्द सांभाळून बोला. जुने वाद उकरून काढू नये.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.