साप्ताहिक राशिभविष्य – १० ते १७ जुलै २०२२
मीन- महत्त्वाच्या खरेदीची लगबग. बऱ्याच दिवसांनी महत्त्वाचे नातेवाईक भेटतील. विद्यार्थ्यांसाठी शुभ वार्ता. ऐकावे जनाचे करावे मनाचे……
कुंभ- मेहनतीला यश मिळेल. कार्य गौरव होईल. कलाकारांना शुभ वार्ता मिळेल. जुन्या अनुभवाने आर्थिक निर्णय घ्या….
मकर – योग्य न वाटणाऱ्या व्यवहारात सौम्य शब्दात नकार द्या. आर्थिक अतिधाडस टाळावे. या सप्ताहात महत्त्वाचे करार मदार करताना सावधानता बाळगावी….
धनु – खर्च व उत्पन्नाचे ताळमेळ साधताना कसरत होईल. परिस्थितीनुसार योग्य मोठा आर्थिक निर्णय घ्या. नातेसंबंध सांभाळा…..
वृश्चिक – दैनंदिनी सांभाळा. दूरचा प्रवास करताना आरोग्य सांभाळा. आपली भूमिका समजून न घेता गैरसमज होण्याची शक्यता. त्यामुळे विचारपूर्वक मध्यस्थी करा…..
तूळ – रेंगाळलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वाटाघाटी यशस्वी होतील. मनासारखी आवक राहील. जमीन जुमला विषयक शुभवार्ता मिळेल…..
कन्या – आपण दिलेल्या सल्ल्याने फायदा झाला तरी त्याचे श्रेय आपणास मिळेल, ही अपेक्षा नको. वास्तविकता स्वीकारा. ऐनवेळी जुनी गुंतवणूक उपयोगी येईल…..
सिंह – स्पष्टवक्तेपणा प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला योग्य वाटेलच असे नाही. कडवट शब्दांपेक्षा गोड शब्दात अधिक चांगली भूमिका आपण मांडू शकाल….
कर्क – केवळ आपल्या मनात इच्छा असून उपयोग नाही, ती व्यक्त करणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य भूमिका मांडावी….
मिथुन – कोणत्याही कारणाने संवाद बंद असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्याची हुरहुर राहील. त्याबाबत आपण स्वतः पुढाकार घ्यावा. जिव्हाळ्याचे संबंध सांभाळावे……
वृषभ – महत्त्वाच्या वाटाघाटी करताना शब्दचातुर्य, मुत्सद्दीपणा आवश्यक आहे. चर्चा यशस्वी होईल, या पद्धतीने सकारात्मक वातावरण असावे…..
मेष – व्यावसायिक वास्तवतापूर्ण निर्णय घ्यावे लागू शकतात. कर्ज प्रकरणे सांभाळा. आपण बरे, आपले काम बरे असे ठेवावे……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेश पंत whatsapp 93 73 91 34 84)…..
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल “सर्व वाचकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
Horoscope Weekly rashi bhavishya 10 to 17 july 2022