साप्ताहिक राशीभविष्य – ११ ते १८ जुलै
मेष – मानसिक प्रसन्नता जाणवेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. पित्ताचा त्रास सांभाळा…
वृषभ – व्यवसायात नव्या कल्पना राबवा. जुने वाद सांभाळा. पित्ताचा त्रास संभवतो…
मिथुन – नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्य संपन्न होतील. मोठा आर्थिक निर्णय सध्या टाळा….
कर्क – संभाळून मध्यस्ती करा. कौटुंबिक वाद टाळा. नवी जबाबदारी विचारपूर्वक घ्या. जुने वाद टाळा…..
सिंह – मोठा आर्थिक निर्णय संभवतो. दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची. जुन्या भेटीगाठी होतील….
कन्या – मेहनतीचे चीज होईल. व्यवसायात नव्या संधी निर्माण होतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल…..
तूळ – आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. रेंगाळलेली प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक प्रश्न विचारपूर्वक सोडवा….
वृश्चिक – नव्या व्यवसायात विचारपूर्वक पदार्पण करा. जबाबदारी आत्मविश्वासाने घ्या. आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स फॉलो करा…..
धनु – वरिष्ठांची शाबासकी मिळेल. मोठी जबाबदारी पार पडेल. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको…..
मकर – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग. मोठी आर्थिक उलाढाल होईल……
कुंभ – नव्या करिअरसाठी उत्तम काळ. टीका सकारात्मकपणे स्वीकारा. सार्वजनिक कामातील सहभाग फायद्याचा……
मीन – लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. उसनवार सांभाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.