साप्ताहिक राशिभविष्य – १ ते ८ ऑगस्ट
मेष – आर्थिक नियोजन संभाळा. व्यवसायिक वसुलीवर लक्ष द्या. उसनवार सांभाळा. मोठी खरेदी विचारपूर्वक करा….
वृषभ- वाहन जपून चालवा. वास्तु विषयक समस्या अनुभवाने सोडवा. आर्थिक प्राप्ती आणि खर्च याबाबत तारेवरची कसरत. गैरसमज टाळा…..
मिथुन – इच्छापूर्ती होईल. जनसंपर्क संभाळून वाढवा. भावनिक बाबीतून त्रास संभवतो. कायदेशीर बाबींना टाळाटाळ नको…..
कर्क – अर्थप्राप्तीसाठी शॉर्टकट नको. अनपेक्षित सुवार्ता मिळेल. प्रदर्शन व उत्सवात सहभाग घडेल. लांबचा प्रवास शक्यतो टाळा…….
सिंह – मौल्यवान कागदपत्रे आणि वस्तू सांभाळा. नवीन परिचय असलेल्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार नको. दीर्घकालीन आर्थिक व्यवहार फायद्याचे…..
कन्या – रेंगाळलेले शुभकार्य ठरेल. सामाजिक क्षेत्रात वलयांकित वातावरण राहील. मोठी खरेदी होईल. कोणताही वाद विकोपाला जाऊ देऊ नये….
तूळ – कर्ज प्रकरण सांभाळा, व्यवसायिक समस्या मिटतील. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक समस्या निराकरण होईल. सहकाऱ्यांशी सौहार्द वातावरण ठेवा……
वृश्चिक – अतिशय फलदायी सप्ताह. तब्येतीची काळजी घ्या. भागीदारी व्यवसाय सांभाळा. जुने आप्तस्वकीय भेटतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल……
धनु – आर्थिक प्राप्तीसाठी बहु पर्यायाचा विचार करा. व्यावसायिक स्पर्धा जाणवेल. जागेचा प्रश्न भेडसावू शकतो. खानपान याची काळजी घ्या…….
मकर – मनासारखा मेनू चाखाल. मोठे आर्थिक निर्णय चर्चेनंतर घ्यावेत. ज्येष्ठांचा सल्ला लक्षपूर्वक मानावा. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. परिश्रमाला पर्याय नाही……
कुंभ – नवीन व्यावसायिक संधी मिळेल. व्यवसाय पॅटर्न बदला. मुद्दाम मुदतीची गुंतवणूक फायद्याची. वास्तुविषयक व्यवहाराबाबत वेट अँड वॉच…….
मीन – टोकदार शब्द टाळावेत. गुप्त शत्रूवर नजर ठेवा. मनासारखी व्यवसायिक घडामोड होईल. आपल्या सूचनांचे कौतुक होईल…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.