साप्ताहिक राशिभविष्य – २१ ते २८ ऑगस्ट २०२२
मेष – या सप्ताहात मुख्यतः विविध प्रकारच्या आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये देणे, घेणे, छोटे, मोठे आर्थिक व्यवहार, कर्ज प्रकरण, आयत्या वेळचे अर्थकारण अशा बाबी असू शकता. सावधपणे व्यवहार करणे गरजेचे आहे…..
वृषभ – अनेक वेळा आपण काही महत्त्वाच्या व्यक्तींना गृहीत धरतो, परंतु असे करणे योग्य नसते. अशी बाब आपल्या लक्षात आली असल्यास आपल्या दृष्टीने अशा महत्त्वाच्या व्यक्तींना गैरसमज होऊ नये यासाठी या सप्ताहात खुलासा करावा लागू शकतो….
मिथुन – विविध प्रकारच्या महत्त्वाच्या शैक्षणिक घडामोडी या सप्ताहात घडू शकतात. शैक्षणिक बाबींवर खर्च. निर्णय घेणे. शैक्षणिक समस्यांवर पर्याय शोधणे. ऐन वेळेच्या शिक्षण समस्या असू शकतात….
कर्क – भावनिक प्रसंगांच्या दृष्टीने हा सप्ताह विशेष महत्त्वाचा असू शकतो. सार्वजनिक जीवनातील ओळखी आपले परिचित, नातेवाईक, मित्रपरिवार यांचे बाबतीतील भावनात्मक घडामोडी या सप्ताहात घडू शकतात…..
सिंह – विविध प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे बनवणे, अथवा जुनी नूतनीकरण करणे, हरवलेली सापडणे यात हा सप्ताह विशेष महत्त्वाचा राहील. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांना वर्गवारी करून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे…..
कन्या – कफाविषयक समस्या या सप्ताहात डोके वर काढू शकतात. त्यामुळे याबाबत अंगावर न काढता योग्य तो औषधोपचार घेणे आवश्यक आहे….
तूळ – विविध जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणारा हा सप्ताह आहे. त्यामध्ये नोकरीविषयक, व्यवसाय विषयक जबाबदारी त्यामध्ये वाढ. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये बदल या सप्ताहात होऊ शकतो…
वृश्चिक – तातडीची कामे व महत्त्वाची कामे अशी कामांची वर्गवारी या सप्ताहात करून घेणे महत्त्वाचे ठरेल. महत्त्वाची कामे ही तातडीची असतीलच असे नाही. परंतु तातडीची कामे ही महत्त्वाची असू शकतात…..
धनु – कडू गोड बातम्या समजण्याचा सप्ताह असू शकतो. गोड बातमी कळल्यानंतर आनंदी होणे स्वाभाविक आहे. परंतु मनाविरुद्ध घटनांनी विचलित होऊ नये….
मकर – नोकरदार व्यक्तींसाठी हा सप्ताह विशेष महत्त्वाचा राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळणे. त्यासोबतच सहकाऱ्यांची सहभावना सांभाळणे, ही तारेवरची कसरत या शब्दात करावी लागू शकते….
कुंभ – सहनशीलतेची परीक्षा बघणारा सप्ताह असू शकतो. त्यामध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक असे विविध बाबींमध्ये समस्यांमधील आपली सहनशीलता या सप्ताहात पुरेपूर वापरावी….
मीन – परिचितांमधील विविध व्यक्तींना त्यांनी आपल्याशी केलेल्या व्यवहारामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळखण्याचा हा सप्ताह असू शकतो. अनुभवाने शहाणे होण्याचा सप्ताह…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप करा 93 73 91 34 84