आजचे राशिभविष्य
गुरुवार – ३० मार्च २०२३
मेष – व्यवसायिकांना आर्थिक व्यवहार समर्थपणे पूर्ण करता येतील
वृषभ – आर्थिक बोलणीत व्यवहारातील सर्व अटींचा अभ्यास करा
मिथुन – आपल्या कार्यक्षमतेचा सहकारी वर्गास योग्य अंदाज येईल
कर्क – आपल्या कर्तव्यास न्याय देण्यासाठी दक्ष रहा. आरोग्य प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका
सिंह – कार्यक्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणे शक्य होईल
कन्या – आपल्या व्यवसाय वृद्धीच्या योजना सफल होतील
तूळ – आपल्या समोरील ताण तणाव हाताळताना पूर्व अनुभवाचा वापर करा
वृश्चिक – आपल्या विरोधातील हालचालींची गती वाढणार आहे. सहकारी वर्गाचा विश्वास संपादन करा
धनु – आपल्या भागीदारांची साथ नवा उत्साह निर्माण करेल. रखडलेली कामे मार्गी लावणे शक्य होईल
मकर – आपल्या विरोधकांना कोंडीत पकडणे शक्य होईल. आपले आर्थिक व्यवहार राहतील. अंदाज खरे ठरतील
कुंभ – मन स्थिर ठेवून आर्थिक समस्या मार्गी लावा
मीन – ग्रह कर्तव्यास न्याय देण्यास दिरंगाई करू नका. घरामधील मंडळींचा मान राखा
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे. यावेळात एखादा किन्नर दिसल्यास जरूर दान करा
आजचे दिनविशेष
आज रामनवमी आहे. चैत्र नवरात्र समाप्ती आहे. या दिवशी आपण सकाळी उठून श्री रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. जवळ राम मंदिर नसल्यास लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. त्याचप्रमाणे गरजवंत व्यक्तींना पिवळ्या मिठाईचे वाटप करावे. रामरक्षा स्तोत्राचे पठण तसेच श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा.
घरातील महिला वर्गासाठी काहीतरी भेटवस्तू द्यावी. तसेच या दिवशी आपल्या कुलदेवतेची उपासना व देवी मंदिरात जाऊन जर देवीची सहपरिवार ओटी भरली तर आपल्याला संपूर्ण वर्ष आनंदात जाईल, यात शंका नाही. ज्यांच्या घरामध्ये सुख संपन्नता नाही अशांनी या दिवशी हळद, गोमूत्र एकत्र करून घरातली फरशी पुसावी. घरामध्ये कापूर होम करावा. धूप लावावा. निश्चित लाभ होईल. उडीद व तीळ मिश्रित पदार्थ गरजवंतांना खायला दिल्यास अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपणास प्राप्त होईल.
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक