आजचे राशिभविष्य
शनिवार – १८ फेब्रुवारी २०२३
आज शनिवार आहे. तसेच, शनी प्रदोष आणि महाशिवरात्रीसुद्धा आहे. आज रात्री १२.२७ ते १.१७ या काळात शिवपूजन करावे. ते केल्यास शिवपूजनाचे उत्तम लाभ मिळतात.
आपल्या वाचकांसाठी महाशिवरात्रीनिमित्त मी खास उपाय घेऊन आलेलो आहे. ते आपापल्या राशीनुसार जर केले तर आपले सर्व कार्य सफल करण्यासाठी भगवान महादेव नक्कीच आशीर्वाद देतील. चला तर जाणून घेऊया…
मेष – झेंडूची फुले व साखर वाहावी. मंत्र ओम रामेश्वराय नमः जप करावा
वृषभ – गाईचे कच्चे दूध व हळद वाहावी. मंत्र ओम उमा महेश्वराय नमः जप करावा
मिथुन – महादेवाच्या पिंडीवर धोतरा अर्पण करावा. मंत्र ओम परमात्मने नमः
कर्क – महादेवावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा. मंत्र ओम महादेवाय नमः
सिंह – महादेवाच्या मंदिरामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा. ओम हरेश्वर नमः जप करावा
कन्या – महादेवाच्या पिंडीवर बेल व साखर वाहावी. जटाधराय नमः जप करावा
तूळ – तिळगुळ व तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. मंत्र ओम प्रणंत क्लेशनाशाय नमः
वृश्चिक – मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. मंत्र गिरजा पतये नमः
धनु – महादेवाच्या मंदिरामध्ये कापूर लावावा. मंदिरामध्ये दान करावे. ओम उमा पतये नमः
मकर – राजगिरा लाडूचा भोग व प्रसाद वाटावा. ओम रुद्राय नमः
कुंभ – गुळ शेंगदाण्याचा भोक व प्रसाद वाटप करावा. ओम रामेश्वराय नमः
मीन – पिंडीवर पांढरा गुलाब किंवा धोत्र्याचे फुल अर्पण करावे. ओम नमः जप करावा
वरील उपाय व जप आपण महाशिवरात्रीपासून पुढील महाशिवरात्रीपर्यंत येणाऱ्या प्रत्येक चतुर्दशी व प्रदोष या दिवशी करावे. तसे केल्यास आपल्या शनी साडेसातीचा तसेच शनि पनोतीचा त्रास होणार नाही. कार्यात येणाऱ्या अडचणींपासून मार्ग मिळण्यास नक्की मदत मिळेल.
आजचा राहु काळ
सकाळी नऊ ते साडेदहा या वेळामध्ये महादेवाचे दर्शन अत्यंत लाभकारक सिद्ध होईल