साप्ताहिक राशिभविष्य – ७ ते १४ नोव्हेंबर
मेष – प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवावी. अनावश्यक जनसंपर्क टाळावा. यशस्वी होण्यासाठी पूर्वानुभव उपयोगी येईल. योग्य नियोजन करून आर्थिक अडचण दूर होईल…..
वृषभ – मानसिक स्थिती सांभाळा. जुने परिचित भेटतील. नवीन कार्यक्षेत्रात वाव. व्यवसायात नवीन प्रयोग होतील. छोट्या गुंतवणुकीत फायदा….
मिथुन – एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे. ताण-तणाव नियंत्रण आवश्यक. ध्यानधारणा, प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करावे. नात्यामधील दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करावा…..
कर्क – जोमाने काम करण्यास उत्तम काळ. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठांची मर्जी राहील. भागीदारी व्यवसायात यश. प्रकृतीकडे लक्ष द्या…..
सिंह – एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कार्यशैली मध्ये सकारात्मक बदल आवश्यक. अपेक्षित प्रगती होईल. टीका खिलाडूवृत्तीने घ्या…..
कन्या – छोट्या-मोठ्या आर्थिक समस्या जाणवतील. येणाऱ्या समस्यांवर विविध पर्यायांचा विचार करून ठेवा. दगदगीमुळे अशक्तपणा जाणवेल. सकारात्मकता वाढवा…..
तूळ – व्यवसाय व त्यांच्या पर्यायावर विचार करून कृती करा. फक्त गोडबोलल्याने काम होणार नाही. प्रत्यक्ष कृती आवश्यक. बोलताना अचूक शब्द वापरा……
वृश्चिक – आर्थिकदृष्ट्या परिस्थिती अनुकूल होण्याची वाट न बघता प्राप्त परिस्थितीला सामोरे जा. प्रयत्नात सातत्य आवश्यक. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा……
धनु – कामाच्या वेळापत्रकात प्लॅनिंग व कृती यांची सांगड घाला. व्यवसायात सकारात्मक सातत्य ठेवा. जवळच्या व्यक्तीची तब्येतीची काळजी घ्या….
मकर – टोकाचे मतप्रदर्शन टाळा. सहकाऱ्यांच्या साथीने टार्गेट पूर्ण होईल. गैरसमज करून घेणे टाळा. शिस्तबद्ध प्लॅनिंग करा….
कुंभ – कामाचे अभ्यास पूर्ण प्लॅनिंग गरजेचे. आर्थिक ताणतणाव कौटुंबिक नात्यांमध्ये येऊ देऊ नये. जुनी येणी येतील. चांगल्या कामासाठी पाठपुरावा आवश्यक……
मीन – उत्पन्ना सोबतच खर्चाचा विचार करा. सोबत बचत करा. व्यावसायिकांनी आपल्या समस्या, पूर्वानुभव आपणच सोडवाव्या. विविध पर्यायांचा वापर करावा. नियोजन गरजेचे……
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे.
शंका समाधान
प्रश्न – अविनाश- जन्म नक्षत्र आराधना म्हणजे काय?
उत्तर – ज्योतिष शास्त्राप्रमाणे ज्योतिष शास्त्रातील कुंडली, त्यातील ग्रहस्थिती, रास, नक्षत्र, गण, नाडी, चरण या प्रमाणेच आपले जन्म नक्षत्र हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटकासाठी विशेष महत्वाचे असते. २७ प्रकारची नक्षत्रे आहेत. त्यातील आपल्या जन्मावेळी कोणते नक्षत्र अवकाशात होते, त्याचा विशेष असा प्रभाव आपणास आपल्या प्रत्येक कृतीवर जाणवत असतो. त्या जन्मनक्षत्राची एक देवता असते. आराध्यवृक्ष असतो. त्या सर्वांचा एक जप असतो. जन्मनक्षत्राबाबत नियमित काही नियम असतात. हे सर्व पाळणे म्हणजे जन्मनक्षत्र आराधना होय.