साप्ताहिक राशिभविष्य – 6 ते 13 मार्च
मेष – यशस्वी मार्गक्रमण होईल. कायद्याची पथ्ये पाळा. अध्यात्मिक प्रगती होईल. वाद टाळा….
वृषभ – वादग्रस्त मंडळींशी संवाद टाळा. अर्थप्राप्तीसाठी शॉर्टकट नको. नोकरीत बढतीचे तसेच नवीन नोकरीचे योग. मोठे व्यावसायिक लाभ….
मिथुन – लांबचा प्रवास योग. तब्येतीकडे दुर्लक्ष नको. युवकांचे प्रश्न मार्गी लागतील. स्पर्धा परीक्षेत यश…..
कर्क – हाडांचे दुखणे सांभाळा. किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. आर्थिक दृष्ट्या मध्यम सप्ताह. वरिष्ठांची मर्जी सांभाळा…..
सिंह – परदेशगमनाची संधी. परदेशात नोकरीची संधी. विवाह ठरतील. आर्थिक नुकसान सांभाळा. कलाकारांना यश…..
कन्या – अतिचिकित्सक मुळे चांगल्या संधी घालवू नये. वैयक्तिक लाभाच्या वार्ता मिळतील. जुनाट आजार सांभाळा. सहकार्याने मोठी काम होतील ….
तूळ – आर्थिक विवंचना कमी होईल. गुंतागुंतीचे काम टाळा. वादग्रस्त मध्यस्ती नको. वाहन जपून चालवा….
वृश्चिक – आकस्मिक कौटुंबिक समस्या शांततेत सोडवा. स्वतःला शांत ठेवा. छोटे वाद मोठे होऊ देऊ नये. मान्यवरांचा सल्ला घ्यावा…. धनु – शैक्षणिक इच्छापूर्ती होईल. आकस्मिक खर्च सांभाळा. कौटुंबिक दुखणी सांभाळा. त्रयस्थ व्यक्तीमुळे घरात वाद टाळावा…..
मकर – विरोधासाठी विरोध करू नये. तात्विक निर्णय घ्यावा. व्यवसाय वाढीची संधी. मंगल कार्य ठरतील….
कुंभ – सरकारी कामे पार पडतील. पोटाच्या तक्रारी सांभाळा. वादग्रस्त आर्थिक देणे घेणे टाळा….
मीन – नोकरीत बदलीची शक्यता. व्यवसाय जागा बदलाची शक्यता. सुरक्षेची काळजी घ्या. व्यर्थ चिंता टाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.