साप्ताहिक राशिभविष्य – 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022
मेष – खाण्या-पिण्याच्या वेळा सांभाळा. तुटेपर्यंत ताणू नका. ऐकाच वेळी विविध आर्थिक पर्यायांवर विचार करू नये. नातेसंबंध सांभाळा….
वृषभ – गैरसमज टाळा व आर्थिक निर्णय घेण्याची घाई नको. प्रकृतीची काळजी घ्या. ताणतणाव टाळा….
मिथुन – उत्पन्नाचे अन्य स्त्रोत तयार करा. तडजोड स्वीकारा. हितशत्रू बाबत दक्षता ठेवा. सामाजिक संबंधाबाबत काळजी घ्या…
कर्क- व्यस्त वेळापत्रक राहील. अहंकार टाळा. मनाजोगे यश मिळेल. भागीदारी व्यवसाय सांभाळा…
सिंह – व्यवसाय वाढीबाबत दक्षता बाळगावी. संधीचा सदुपयोग करावा. मोसमी आजार सांभाळा. लहानग्यांची तब्येत सांभाळा…
कन्या – मानसन्मान मिळेल. अति परिश्रम टाळा. प्रकृतीबाबत सावध राहा. छोट्या-मोठ्या समस्या समजुतीने सोडवा….
तूळ – करारमदार सांभाळा. नवे परिचय सांभाळून करा. सामंजस्याने फायदा होईल. वाद-विवाद करण्यापेक्षा मधला मार्ग स्वीकारा… वृश्चिक – व्यापारात अपेक्षित लाभ. योग व प्राणायाम यावर भर द्या. विचार सकारात्मक ठेवा. मौखिक आरोग्य सांभाळा…
धनु – मोठा आर्थिक निर्णय टाळा. ज्येष्ठांची प्रकृती सांभाळा. व्यापार बदल टाळा. जुनाट आजार सांभाळा….

व्हॉटसअॅप – 9373913484
मकर – चर्चेतून समस्यांचा मार्ग काढा. धार्मिक कार्य संभवते. कौटुंबिक मनस्वास्थ्य सांभाळा. अनपेक्षित शुभवार्ता मिळेल….
कुंभ – छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद टाळा. भावनिक मूल्यांकन गरजेचे. खर्चावर नियंत्रण ठेवा. अपेक्षित वस्तू लाभ….
मीन – मोठी खरेदी संभवते. दीर्घ गुंतवणुकीचा फायदा. वादाचे विषय टाळा. मध्यस्थी जपून करा………….
शंका समाधान
प्रश्न – अभिजीत – पुष्कराज रत्ना बद्दल माहिती सांगावी?
उत्तर- पुष्कराज रत्न विविध स्वरुपात उपलब्ध असते. त्यामध्ये सिलोन, बँकोक, तोपाज, पिवळा हकीक हे प्रकार आहेत. त्यातील सिलोन या प्रकारातील पुष्कराज बर्यापैकी महाग असतो. पुष्कराज रत्नाची क्लारिटी, आकार, व कॅरेट यावर त्याची किंमत ठरते. प्रसंगी दोन हजार रुपये कॅरेट पासून पंचवीस हजार रुपये कॅरेट पर्यंत असू शकते. पुष्कराज रत्न तर्जनी अर्थात इंडेक्स फिंगर या गुरूच्या बोटात सोने या धातू मध्ये वापरले जाते. राशीला गुरु बळ नसल्यास कुंडलीतील गुरू 6,8 ,12 स्थानांमध्ये असल्यास, गुरु राहु केतु युक्त असल्यास धनु अथवा मीन लग्नेश स्वामी गुरु हा 6, 8 ,12 स्थानांमध्ये असल्यास, त्याचप्रमाणे इंडेक्स फिंगर खाली जाळी अथवा ✖️ चे चिन्ह असल्यास, वास्तूमध्ये उत्तर पूर्व ईशान्य दिशेस दोष असल्यास, पुष्कराज रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. अंगठी अथवा पेंडंट स्वरूपात वापरले जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.