साप्ताहिक राशिभविष्य – 27 फेब्रुवारी ते 6 मार्च
मीन – सध्याचा काळ थोडा तणाव युक्त असला तरी तो अपयश पदरी पडू देणार नाही. आहाराचे वेळापत्रक पाळावे. कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्यावी….
कुंभ- आप्तेष्टांबरोबर मतभेद टाळावे. मनाजोगती यशप्राप्ती होईल. सर्वच ठिकाणी प्रतिक्रिया देणे टाळावे. प्रतिष्ठित लोकांचे सहकार्य लाभेल….
मकर- परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करावा. फक्त स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. अपयशातून शांत बुद्धीने मार्ग काढावा. मोठे आर्थिक व्यवहार सध्या टाळा….
धनु- आहाराबाबतच्या बेपर्वाईने त्रास होईल. यश आणि धनलाभ दोन्ही मिळेल. स्वतःचा अंदाज स्वतः बांधा व त्यावर मार्गक्रमण करा. शब्दाने शब्द वाढणार नाही, असे बघा…
वृश्चिक- प्रगतीचा वेग चांगला राहील. अनेक प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी होतील. मालमत्ताविषयक प्रश्न मार्गी लागतील. गुरुतुल्य व्यक्तींचा सल्ला मोलाचा राहील….
तूळ- मित्रपरिवार तसेच आप्तेष्टांमधील मधील वाद अंगावर घेऊ नये. ओळखीच्या प्रतिष्ठितांचा फायदा होईल. कलाकारांसाठी नव्या संधी….
कन्या- वागणे-बोलणे संयमित ठेवा. आपल्यामुळे मतभेद वाढणार नाहीत, याची काळजी घ्या. मध्यममार्गी भूमिकेत राहा. अडकलेली कामे मार्गी लागतील…
सिंह- आपला आवाका ओळखून विरोध पत्करावा. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. पाठदुखीच्या तक्रारी सांभाळा. प्रलोभनांपासून लांब राहा….
कर्क- ओळखीच्या लोकांकडून मर्यादित अपेक्षा ठेवा. आर्थिक बाबतीत गाफील राहू नका. सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल….
मिथुन – जुन्या मित्र परिवाराचा सल्ला महत्त्वाचा राहील. प्रवासात खर्च सांभाळा. तर्कावर आधारित निर्णय घ्या. पित्तविकार सांभाळा….
वृषभ- अनपेक्षित सामाजिक समस्या सांभाळा. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी. सुसंवादातून अनेक समस्या सुटतील. मतभेदाचे प्रसंग चतुराईने हाताळा…..
मेष – रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्याला टोचतील असे शब्द टाळा. नव्या योजना अमलात येतील. मोठी जबाबदारी पार पडेल….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…