साप्ताहिक राशिभविष्य – २६ डिसेंबर ते ३ जानेवारी
मेष – प्रत्येक कामात एकाग्रता आवश्यक. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवा. पूर्वानुभव वापरून समस्या सोडवा. उत्पन्नाच्या विविध पर्यायांचा विचार करा…
वृषभ – अनपेक्षित अर्थलाभ. कामाचे अभ्यासपूर्ण प्लॅनिंग करा. कौटुंबिक नात्यांमध्ये आर्थिक ताण-तणाव येऊ देऊ नये. चांगल्या कामासाठी पाठपुरावा आवश्यक…
मिथुन – वाटाघाटीत सहकाऱ्यांच्या साथीने टार्गेट पूर्ण होईल. काही समज टाळा. शिस्तबद्ध प्लॅनिंग आवश्यक…
कर्क – सामाजिक परिघ याचा फायदा होईल. कामाच्या वेळापत्रक प्लॅनिंग व कृती यांचा मेळ ठेवा. व्यवसायात सकारात्मक सातत्य आवश्यक. जवळच्या व्यक्तींशी वाद टाळा…
सिंह – गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार नको. आर्थि दृष्ट्या परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघू नये. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन प्रयत्नात सातत्य आवश्यक. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
कन्या – सीजनल व्यवसाय व त्यांचे पर्यायावर विचार करून ठेवा. गोड बोलून काम होणार नाही. प्रत्यक्ष कृती आवश्यक. बोलताना अचूक शब्द वापरा….

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – व्यवसायिक आर्थिक व्यवहार संभाळा. किरकोळ आर्थिक समस्या जाणवतील. समस्यांवर विविध पर्यायांचा विचार करून ठेवा. सकारात्मकता आवश्यक. टेन्शन टाळा….
वृश्चिक – अनोळखी व्यक्तीबाबत सतर्क राहणे आवश्यक. एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सार्या शैलीमध्ये सकारात्मक बदल आवश्यक. अपेक्षित प्रगती होईल….
धनु – अनामिक हुरहुर. जोमाने काम करण्यास उत्तम काळ. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राहील. भागीदारी व्यवसायात यश….
मकर – जवळच्या व्यक्तीबाबत चिंता. एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे. ताणतणाव नियंत्रण आवश्यक. ध्यानधारणा, प्राणायाम यावर लक्ष द्यावे….
कुंभ – बढतीचे योग. मानसिक स्थिती सांभाळा. जुने परिचित भेटतील. नवीन कार्यक्षेत्रात व व्यवसायात नवीन प्रयोग होतील….
मीन – परिस्थितीचे भान असावे. प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवावी. अनावश्यक जनसंपर्क व खर्च टाळावा. पूर्वानुभव उपयोगी येईल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे