साप्ताहिक राशिभविष्य – 20 ते 27 फेब्रुवारी
मेष – प्रतिष्ठा सांभाळा. छोट्याशा चुकीमुळे मनस्ताप होऊ शकतो. अधिकाराची सीमारेषा ओलांडू नये. शुभवार्ता मिळेल….
वृषभ – मनाजोगी प्राप्ती होईल. नूतन वास्तू खरेदीचा निश्चय होईल. शुभकार्य ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा….
मिथुन – जुना मित्रपरिवार भेटेल. घेण्या-देण्याचे व्यवहार सांभाळा. भावना विश्वात तारेवरची कसरत होईल….
कर्क – आपले मत मोकळेपणाने व्यक्त करा. सौम्य शब्दात परंतु स्पष्ट बोला. जुनी येणी येतील…
सिंह – शाब्दिक हल्ला मुद्देसूदपणे परतवून लावा. तर्कसंगत विचार करावा. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. गुणवत्ता ठेवून स्पर्धा करावी….
कन्या – आपला सल्ला मानलाच पाहिजे, असा आग्रह नको. दूरस्थ स्वकीयांशी संवाद होईल. अतिचिकित्सा टाळा…

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – मोठी खरेदी विश्वासपूर्वक करा. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. अती भावनिकता टाळा. जशास तसे असावे…. वृश्चिक – मोठ्या व्यवहारात अनुभवी मध्यस्थी ठेवावा. तज्ञांच्या सल्ल्याने मोठा निर्णय घ्यावा. धार्मिक उपाय पूर्ण करावेत. व्यवसाय वृद्धी होईल…..
धनु – तोल मोल के बोल. आधी ऐका मग बोला. वास्तविकता स्वीकारा. वास्तूबदल शक्यता पायाचे दुखणे सांभाळा….
मकर – अनोळखी व्यक्तीशी व्यवहार टाळा. प्रासंगिक प्रलोभनांना बळी पडू नये. प्रवास योग घडेल….
कुंभ – अचूक शब्दात आपले म्हणणे मांडा. अपमान करण्यापेक्षा स्वतःचा मान ठेवा. जाणिव नसणाऱ्यांना मदत करू नये….
मीन – निश्चित ध्येयावर काम करावे. अनेक सल्लागार नेमू नये. वैचारिक गोंधळ टाळावा. ज्येष्ठांचा सल्ला मानावा….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.