साप्ताहिक राशिभविष्य – २ ते ९ जानेवारी २०२२
मेष – अनपेक्षित जबाबदारी वाढेल. सहन शक्ती वाढवा. हितचिंतकांमुळे मानसिक आधार मिळेल. प्रत्येक बाबतीत आपलाच हेका सोडावा……
वृषभ – मागील अनुभव व भविष्यकालीन लॉजिक याचा समतोल साधून निर्णय घ्यावे. बऱ्याच प्रकारच्या आर्थिक संधी उपलब्ध होतील. ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा….
मिथुन – अंशी खरेदीवर खर्च टाळावा. अनपेक्षित मोठा खर्च समोर घेतील. पोटाच्या तक्रारी सांभाळा. योगासन प्राणायाम यावर भर द्या. बच्चे कंपनीला विविध बाबतीत यश मिळेल….
कर्क – निर्णय घेण्यामध्ये दोलायमान मनस्थिती टाळावी. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. सार्वजनिक कार्यात आघाडीवर राहाल. धार्मिक कार्य पार पडेल……
सिंह – फायदे आणि तोटे याचे व्यवहार त्याच्या अंदाज प्रक्रियेत गल्लत करू नये. योग्य तिथेच वेळ खर्च करावा. भावना आणि व्यवहार यामध्ये दोलायमान स्थिती टाळावी….
कन्या – कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नये. चित भी मेरी पट भी मेरी असा स्वभाव नको. जुन्या चिंता मिटतील. गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न मिळेल…..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – विनाकारण वादांमध्ये पडू नये. शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पावले पडतील. आर्थिकदृष्ट्या स्पर्धात्मक सप्ताह. गुंतवणुकीचा दीर्घकालीन विचार करावा…..
वृश्चिक – कौटुंबिक जबाबदारी वाढेल. चिडचिड टाळावी. अनपेक्षित सुखद घटना घडेल. आर्थिक भार वाढल्यास परफेक्ट प्लॅनिंग करावे…..
धनु – कोणत्याही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा. आर्थिक मेळ योग्य पद्धतीने करा. अनपेक्षित खर्च टाळा. सप्ताह शेवटी शुभवार्ता मिळेल……
मकर – टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारा. सहकार्य करताना मागील अनुभव लक्षात ठेवावा. परिचित सदस्यांमध्ये वाद होणार नाही, याची काळजी घ्या. गैरसमज टाळा…..
कुंभ – एकाग्रता वाढवावी. गैरसमजातून कोणते मत बनवू नये. विनाकारण वाद टाळावे. मानसिक स्वास्थ्य सांभाळा…..
मीन – घर सजावटीच्या नवनवीन कल्पना सुचतील. मनासारखं मेनू बनेल. मनासारखी खरेदी होईल. आलेल्या समस्यांमध्ये अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.