साप्ताहिक राशिभविष्य – 17 ते 24 एप्रिल
मेष – निश्चित ध्येय असल्यास यश अवश्य मिळेल. ऐकावे जनाचे करावे मनाचे. विचारातील गोंधळ टाळावा. अनुभवी सल्ला मानावा…..
वृषभ – स्वतःचा मान राखा. प्रतिक्रियेसाठी अचूक शब्दांचा वापर करा. जाणीव नसणाऱ्यांना मदत करू नये…..
मिथुन – अपरिचित व्यक्तींशी मोठा व्यवहार टाळा. किरकोळ प्रलोभनांना बळी पडू नये. अचानक प्रवास योग…..
कर्क – स्तुती करणाऱ्यांपासून लांब रहा. बच्चे कंपनीसाठी आनंदाचा सप्ताह. महत्त्वाच्या बाबतीत स्पष्ट बोलावे. आत एक बाहेर एक असे राहू नये….
सिंह – योग्य तिथे स्वतःच्या स्वभावात बदल करावा. अपयशातून शांतपणे मार्ग काढावा. मोठे आर्थिक व्यवहार सध्या टाळा…..
कन्या – नातलगांसोबतचे मतभेद मिटवा. मनासारखे यश मिळेल. योग्य तिथे मौन पाळावे. सोप्या शब्दात प्रतिक्रिया द्यावी…..
तूळ – सध्याचा काळ आर्थिक तडजोडीचा असल्याने योग्य तिथे तडजोड स्वीकारावी. तणाव टाळा. अपयश मिळणार नाही…..
वृश्चिक – सौम्य शब्दात परंतु स्पष्ट बोला. घसा तसेच छातीच्या त्रासाकडे दुर्लक्ष नको. तर्कसंगत विचार करा. गुणवत्तेसह स्पर्धा असावी….
धनु – जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. शुभकार्य ठरेल. नूतन वास्तू खरेदी चर्चा. खर्चावर नियंत्रण ठेवा…..
मकर – आपले म्हणणे ऐकले पाहिजे असा आग्रह नको. स्वकियांशी मतभेद टाळा. मोठी खरेदी होईल. अति चिकित्सा नको….
कुंभ – पायाचे तसेच गुडघ्याचे दुखणे सांभाळा. निश्चित ध्येय यावर काम करा. अनुभव नसणारा सल्लागार नेमू नये……
मीन – सत्पात्री दान करावे. शुभ कार्य दृष्टीने हालचाली. शैक्षणिक सुवार्ता. गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळेल……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.