आपली रास – आपली धनप्राप्ती
यंदाच्या वर्षात आपल्याला नक्की काय प्राप्त होणार आहे, याबाबत प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. याकरता आपल्या राशीनुसार नवीन वर्षात पुढील टिप्स फॉलो करून बघा. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल..
मीन
ठरवलेल्या ध्येयाबाबत धरसोड न करता ठाम निश्चयाने एकाच ध्येयावर कार्यरत राहावे. यशप्राप्ती निश्चित होईल…
कुंभ
इतरजनांचा प्रत्येक वेळी फारसा विचार न करता आपल्या स्वतःच्या प्रगतीचा विचार अधिक केल्यास आपणास निश्चित यशप्राप्ती होईल
मकर
आपण मेहनत खूप करता परंतु ऐन फळ मिळण्याच्या वेळी आपण प्रयत्न सोडून देता, असे करू नये. यश निश्चित मिळेल
धनु
ऐकावे जनाचे, करावे मनाचे, असे राहावे. प्रत्येकवेळी आपल्या फायद्याचे सल्लागार मिळतात, असे नाही….
वृश्चिक
यश मिळण्यासाठी योग्य ती वाट धरलेली असतानाही मध्येच अन्य वेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू होतो. गडबड तिथेच होते.
तूळ
अतिविश्वास घातक ठरतो. त्यामुळे ज्याला यश मिळाले आहे, त्यावरच विश्वास ठेवावा. म्हणजे तसे प्रयत्न केल्यास आपणासही यश मिळेल.
कन्या
कायम शंकास्पद स्वभाव ठेवल्याने योग्य तिथे फायदा होत नाही. फायदा होणार असेल तिथेच शंका निर्माण होते….
सिंह
नियमित पारंपरिक एकाच पद्धतीने प्रयत्न करण्यापेक्षा विविध पद्धतीने प्रयत्न करा. यशप्राप्ती निश्चित होईल.
कर्क
देईल हरी खाटल्यावरी असे राहू नये आता जे मिळाले आहे. त्यापेक्षा अधिक पुढे लागणार आहे, याची तजवीज करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
मिथुन
अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य अंगीकरावा. मी का कुणाचे ऐकू असे असल्यास आपणास योग्य व्यक्तींचा सल्ला मिळणार नाही.
वृषभ
एकाच ठिकाणी अधिक गुंतवणूक करण्यापेक्षा विविध ठिकाणी थोडी-थोडी गुंतवणूक करावे. नुकसान झाल्यास थोडेच होईल….
मेष
स्वतःचे तर्कशास्त्र लावावे. केवळ जुने संबंध, ओळख या आधारावर मोठी गुंतवणूक करू नये. योग्य वेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी…