कर्क रास – 2022
– सर्वच ठिकाणी शांत स्वभावा पेक्षा योग्य तेथे मनमोकळेपणाने भावना व्यक्त कराव्या…..
– आपल्या मनाविरुद्ध घटनांचा त्रागा करून घेऊ नये….
– काल्पनिक दुःखातून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडून घेऊ नये….
– आपल्या कार्याचा लेखाजोखा पाहून वरिष्ठांतर्फे यंदा कार्य गौरव होईल….
– विद्यार्थ्यांनी किरकोळ अपयश मनाला लावून घेऊ नये येणारा काळ देदीप्यमान आहे….
– गृहिणी वर्गाने मनात ठेवलेली मोठी खरेदी यंदा जरूर पार पडणार आहे….
– व्यवसायिकांना स्पर्धेस तोंड देण्यासाठी सज्ज राहावे लागेल….
– ज्येष्ठांनी कुटुंबातील सदस्यांना आपली कशा पद्धतीने मदत होईल असे पाहावे….
– PRESENT मध्ये राहण्याचे तंत्र आत्मसात करावे….
– कोणत्याही समस्येवर मार्ग काढण्याचे बघावे समस्येवर चर्चात्मक खल करू नये…..
– काही नक्षत्रावर चरण धारकांना परदेश गमन योग आहे….
– विवाह इच्छुकांनी जोडीदारा च्या उंची रंग वयातील अंतर याबाबत व्यावहारिक तडजोड केल्यास अडकलेली शुभ कार्य ठरतील…..
– वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या चुकीबद्दल धारेवर न धरता फक्त योग्य ती समज द्यावी….
– या वर्षात सार्वजनिक कटुता टाळावी तसेच मागील कटूते बद्दल स्वतःहून समेट करावा…..
– गडद रंगाच्या मोठ्या वस्तूंची खरेदी टाळावी….
व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी व्हॉट्सअपवर अपॉइंटमेंट घ्यावी…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.