सूर्याचे (रवी) कुंभ राशीत गोचर भ्रमण
रविवारी (13 फेब्रुवारी) रोजी पहाटे 3:16 नी सूर्य अर्थात रवीचे कुंभ राशीत गोचर भ्रमण झाले आहे. तो एक महिना कुंभ राशीत स्थानापन्न राहणार आहे. कुंडलीतील रवी अर्थात सूर्य हा आत्मविश्वास, आत्मबल, स्वाभिमान, मान-सन्मान, प्रतिष्ठा, वडील, काका, लढाऊ वृत्ती, धैर्य, चिकाटी, विश्वास, प्रशासनातील अधिकार, राजकीय स्थैर्य, मोठ्या आर्थिक उलाढाली, जमीन जुमला, त्याचप्रमाणे शरीराचे शीरभागातील ब्रह्मरंध्र याचा द्योतक आहे. म्हणूनच कुंडलीचा अभ्यास करताना कुंडलीतील रवीचे स्थान, त्याची स्थिती, त्याचे युती ग्रह याचा प्रथम अभ्यास केला जातो. सूर्य अर्थात रवीचे कुंभ राशीत गोचर भ्रमण बारा राशींवर पुढील प्रमाणे परिणाम करू शकते. त्यामुळे योग्य ती सावधानता बाळगल्यास रवी उत्तम फळ देतो…

व्हॉटसअॅप – 9373913484
मेष – मेष राशीच्या एकादश भावात सूर्य येत असल्याने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे रहावे…..
वृषभ- दशम भावात रवी येत असल्याने नोकरदार तसेच व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त होतील….
मिथुन- नवम भावात रवी येत असल्याने मेहनतीला यश येईल, शुभवार्ता कळतील….
कर्क- अष्टम भावात रवी येत असल्याने वाहन विषयक सर्वतोपरी काळजी घ्यावी. तब्येतीची विशेष काळजी घ्यावी….
सिंह- सप्तम भावात रवी येत असल्याने विवाह इच्छुकांची कार्य ठरतील. जोडीदारास उत्पन्नाच्या चांगल्या संधी प्राप्त होतील…
कन्या- षष्ठम भावात रवी येत असल्याने नातलगांशी वाद टाळावे. जमीन जुमलाचे व्यवहार सामोपचाराने सोडवावे…..
तूळ- पंचम भावात रवी असल्याने शैक्षणिक शुभवार्ता. शिक्षणात यश मिळेल….
वृश्चिक- चतुर्थ भावात रवी येत असल्याने वास्तुविषयक खरेदी. कौटुंबिक मोठ्या वस्तू खरेदी होऊ शकते. परंतु कौटुंबिक वाद मात्र टाळले पाहिजेत…..
धनु- तृतीय भावात रवी येत असल्याने भावंडांसोबत वाद टाळावेत….
मकर- द्वितीय भावात रवी येत असल्याने आकस्मिक मोठे खर्च शक्यता. उत्पन्नाचे योग्य ते प्लॅनिंग करावे…
कुंभ- स्वराशीत रवी असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन व्यवसायाच्या संधी साधल्या जातील. जमीन विषयक व्यवहार होतील…
मीन- एकादस भावात रवी येत असल्याने सार्वजनिक वाद टाळावेत. सौम्य शब्दाचा वापर करावा.