कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दैनंदिन जीवन जगत असताना काल काय घडले याचा आपण सतत विचार करत असतो, तसेच सध्याच्या काळात काम करताना त्याचेही भान असते. परंतु आपल्या जीवनात भविष्यात काय होणार ? याची देखील प्रत्येकाला चिंता असते. त्यामुळे भविष्यातील घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची बहुतांश जणांना उत्सुकता असते. साहजिकच राशिभविष्य पाहण्याचा अनेकांना छंद तथा आवड असते.
सध्या तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चांगलेच उजळणार असल्याचे सांगण्यात येते. कारण ज्योतिष शास्त्रानुसार वेळोवेळी होणाऱ्या ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. एका राशीचा दुसऱ्या राशीत प्रवेश होण्याला संक्रमण म्हणतात. या संक्रमणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसू शकतो. हे संक्रमण काहींसाठी भाग्यदायी तर काहींसाठी अशुभ ठरते. मंगळ ग्रहाने दि. २७ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला असून दि १० ऑगस्टपर्यंत तो या राशीत राहील. विशेषतः तीन राशींवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव दिसून येणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊ या…
मिथुन :
चांगले उत्पन्न आणि लाभाचे घर मानल्या जाणाऱ्या या राशीच्या कुंडलीतून मंगळाचे ११व्या घरात भ्रमण होत आहे. या काळात उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर व्यवसायातही चांगला नफा होईल. मंगळाचे संक्रमण आर्थिक बाजू मजबूत करेल. तसेच यादरम्यान कार्यशैलीतही सुधारणा होईल. या काळात बॉसचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या सातव्या घरातील स्वामी ग्रह मंगळ आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. या व्यक्तींना पन्ना रत्न घालण्याचा सल्ला दिला जातो.
सिंह :
विशेष म्हणजे या राशीच्या नवव्या घरात हे संक्रमण झाले असून हे भाग्य आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याचबरोबर बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे होताना दिसतील. या दरम्यान, व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होण्याची शक्यता आहे, जी भविष्यात फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
कर्क :
या राशीच्या दशम स्थानात मंगळाचे संक्रमण झाले आहे. हे कार्यक्षेत्र आणि नोकरीची भावना मानली जाते. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे. मंगळ संक्रमणामध्ये मालमत्ता आणि वाहनाच्या व्यवहारातही चांगले आर्थिक लाभ होतील. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. या दरम्यान, मोती रत्न धारण करणे अनुकूल सिद्ध होईल, असे दिसते.
Horoscope Astrology Three Signs Peoples Benefits