इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दैनंदिन व्यवहार करत असताना आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात जे दुसऱ्यांना चुना लावण्यात म्हणजेच फसवणूक करण्यात वस्ताद असतात. ही मंडळी अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असतात. गोड बोलून स्वतःचे काम काढून घ्यायचे आणि स्वतःची मदत करण्याची वेळ आली की, पाठ फिरवायची. असे काही जण आपल्या मित्रपरिवारात असतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की, खरा मित्र संकटकाळात ओळखला जातो. मित्र तोच असतो जो अडचणीत मदत करतो. तो सुख-दुःखात सोबत असतो. जोतिष्यशास्त्रात असे काही राशी सांगण्यात आल्या आहेत ज्या राशीच्या व्यक्ती गोड बोलून स्वतःचे काम करून घेतात.
वृषभ :
या राशीवर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुखी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीच्या व्यक्तीची मित्र-मंडळी खूप असते. त्यांच्याकडे इतरांना आकर्षित करण्याची विशेष कला आहे. त्याच्या बोलण्याने आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन प्रत्येकाला त्यांच्या जवळ यावेसे वाटते. या व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचा वापर करण्यात पटाईत असतात.
कुंभ :
या राशीचे नागरिक महत्वकांक्षी असतात. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही थराला जातात. कधी कधी ते चुकीचा मार्गही स्वीकारतात. यामुळे त्यांच्या संपर्कातले व्यक्ती त्यांच्या कुकृत्याला बळी पडतात. या राशीचे नागरिक त्यांच्या वैयक्तिक हितासाठी एखाद्याला चुना लावायला मागेपुढे पाहत नाही.
सिंह :
या राशीच्या नागरिकांना सत्ता प्रिय असते. स्वतःचे अधिकार कायम ठेवण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. यासाठी ते एखाद्याचा गैरवापर करण्यात पटाईत असतात. दुसऱ्यांच्या खांदयावर बंदूक ठेऊन काम करण्यात ते पटाईत असतात. त्यांच्या अति महत्वकांक्षी स्वभावामुळे ते गोड गोड बोलून इतरांना चुना लावतात.
Horoscope Astrology Peoples Cheating Fraud Be Alert