नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपले राशिभविष्य जाणून घेण्याची अनेकांना आवड असते. काहीजण वार्षिक राशी भविष्य बघतात. काही मासिक राशिभविष्यावर नजर टाकतात. तर काही व्यक्ती या दैनंदिन राशिभविष्य जाणून घेतात. आपल्या भविष्यात नेमकी काय आहे याचा अंदाज घेण्याचा त्यामध्ये प्रयत्न असतो
महत्त्वाचे म्हणजे ज्योतिषशास्त्रामधे गुरु ग्रहाला विशेष स्थान आहे. ज्ञान, वृद्धी, शिक्षक, संतती, शिक्षण संपत्ती, परोपकार, पिता-पुत्राच्या नातेसंबंध इत्यादींचा हा कारक ग्रह आहे. जेव्हा जेव्हा गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या सर्व घटकांवर त्याचा प्रभाव पडतो. यासोबतच गुरूच्या राशींवरही बृहस्पती परिवर्तनाचा परिणाम होतो. गुरू ग्रहाने १२ एप्रिलला मीन राशीत प्रवेश केला आहे. जोतिषशास्त्रानुसार २० जुलैपासून ३ राशींवर विशेष प्रभाव पडेल. कोणत्या ३ राशी आणि त्यांचा काय फायदा होऊ शकतो, हे जाणून घेऊ या..
वृषभ :
महत्वाचा ग्रह गुरुने राशी बदलताच चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण तुमच्या राशीतून गुरू ग्रहाने ११ व्या घरात प्रवेश केला आहे. जे उत्पन्न आणि लाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात उत्पन्नात चांगली वाढ होईल. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायात प्रचंड नफा होऊ शकतो. तसेच, यावेळी सर्व राज सुख मिळतील. या कालावधीत कोणत्याही व्यावसायिक व्यवहारात चांगला नफा कमवू शकता. तुमच्या कार्यशैलीत सुधारणा देखील पाहायला मिळेल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी वेळ फॅबरमध्ये आहे. तो सुरू करू शकतो. तसेच गुरु हा तुमच्या ८ व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी संशोधनाशी निगडित असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे.
मिथुन :
सध्या गुरू राशी बदलताच नशीबाची साथ मिळू शकते. कारण तुमच्या दशम भावात गुरु ग्रहाचे भ्रमण झाले आहे. ज्याला नोकरी, व्यवसाय आणि कामाची जागा समजली गेली आहे. त्यामुळे यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. कामाचे ठिकाण बदलाची शक्यता आहे. यासोबतच या काळात प्रमोशनही मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. तसेच नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊन व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. त्याचबरोबर मार्केटिंग, निवेदक, चित्रपट क्षेत्र आणि मीडिया या क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे.
कर्क :
यात गुरु ग्रहाचे राशी परिवर्तन होताच चांगली कमाई करू शकता. कारण तुमच्या गोचर कुंडलीवरून गुरु ग्रह नवव्या भावात प्रवेश करत आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात भाग्य आणि परदेश प्रवासाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळू शकते. यासोबतच रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत. आपण व्यवसायाच्या संदर्भात लहान आणि मोठे प्रवास देखील करू शकता, तसेच ते लाभदायक ठरू शकतात.
Horoscope Astrology Jupiter One Year Benefit