आपली रास मेष आहे का?
2023 असं जाईल जाणून घ्या
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या लोकांना नवे वर्ष कसे जाणार याबाबत आपण माहिती घेत आहोत. रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहचवत आहोत. आज आपण मेष राशीची माहिती जाणून घेणार आहोत.
मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नितत्त्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत.
मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या, धीट, महत्त्वाकांक्षी, कोणत्याही समस्येला बुद्धीने तोंड देणाऱ्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष, कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात.
मेष राशीच्या स्वभावानुसार, ही रास असणाऱ्यांत नेतृत्वगुण असल्यामुळे राजकारणी, सैन्याधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त यशस्वी होतात.
मेष रास – २०२३
१) मेष राशीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी यावर्षी थोडी अधिक मेहनत करावी लागणार आहे. हव्या त्या क्षेत्रात संधी मिळणे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळणे अपेक्षे सारखे मार्क मिळणे याकरता ही मेहनत आवश्यक ठरणार आहे…..
२) भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या भागीदारांसोबतचा संवाद व्यवस्थित ठेवावा. भागीदारास योग्य ते स्थान द्यावे.
३) महिला वर्गाला राजकारण तसेच सामाजिक कार्यात विविध महत्त्वाची स्थाने प्राप्त होतील..
४) आर्थिक व्यवहाराबाबत दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक करावी…
५) डोकेदुखी पायाच्या व गुडघ्याच्या नसा दुखणे याकडे दुर्लक्ष नको..
६) विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल..
७) मेष राशीच्या व्यवसायिकांना यंदाच्या वर्षी एकापेक्षा जास्त प्रकारचे व्यवसाय करण्यात यश मिळेल..
८) कोर्ट कचेरीच्या कामात आपला हेका न धरता तडजोड स्वीकारावी….
९) आर्थिक समस्यांचा योग्य तो अभ्यास करावा…
१०) परिचित तसेच जुन्या ओळखीच्या व्यक्तींबरोबर आर्थिक व्यवहार ठेवावेत..
टीप – वरील टिप्स या मेष राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. मेष राशीत असलेली भरणी, अश्विनी, कृतिका* या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तु व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष..
पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84….
सर्व राशीच्या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा