कुंभ राशीसाठी असेल असेल २०२३ हे वर्ष
वाचकांच्या आग्रहास्तव सर्व बारा राशींच्या व्यक्तींना नवे वर्ष कसे जाणार याबाबतचा रोज एका राशीचा अंदाज दहा टिप्सच्या स्वरूपात आपण देत आहोत. काल आपण वृषभ रास बघितली. आज आपण कुंभ राशिविषयी जाणून घेऊ…
ज्योतिषशास्त्रानुसार ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. या व्यक्तींना प्रिय बोललेले आवडते आणि अप्रिय बोलणे सहन होत नाही.
या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात, असे फलज्योतिष्यात सांगितले आहे. ही जन्मरास असलेल्या बाळाला – गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, द यांपैकी एखाद्या आद्याक्षराचे नाव ठेवतात.
१) नवीन वर्षात आपणास नवनवीन ध्येय निश्चित करावे लागतील. ही सर्व ध्येय गाठण्यासाठी अहोरात्र पाठपुरावा करावा लागेल….
२) मागील वर्षातील कुरबुरी, वाद यावर्षी पूर्णपणे मिटवावे लागतील.
३) अनेक वर्ष चालत आलेल्या दिवाणी दाव्यात आपणास मनासारखे यश मिळेल..
४) विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हार्डवेअर इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, लोखंडाच्या वस्तू निर्माण, जड वस्तू संबंधातील व्यवसाय याकडे विशेष लक्ष द्यावे…
५) नवीन वर्षात आपणास घरातील शुभ कार्य तसेच अर्थ प्राप्ती विषयक शुभवार्ता मिळणार आहेत..
६) नातेवाईक हितसंबंधी, परिचित, मित्रपरिवार यांच्याकडून देखील विशेष सहकार्य मिळणार आहे..
७) महिला वर्गाने स्वतःचे नवीन व्यवसाय यावर्षी सुरू करण्यास हरकत नाही..
८) कुंभ राशीच्या ज्येष्ठांनी यावर्षी हाडांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याचप्रमाणे आहार विषयक नियम पाळणे आवश्यक आहे…
९) नोकरदारांना बढतीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे विचारपूर्वक नोकरीमध्ये बदल करावा. व्यवसायिकांना व्यवसायासाठी आवश्यक नवीन कर्ज घेताना आवश्यक तेवढ्याच रकमेचे घ्यावे…
१०) कुंभ राशिवाल्यांनी यावर्षी शॉर्टकट, फायद्याच्या व्यवसायाचा विचार करू नये…
टीप- वरील टिप्स या कुंभ राशीसाठी सर्वसमावेशक आहेत. कुंभ राशीत असलेली धनिष्ठा, पूर्वा भाद्रपदा, शततारका या नक्षत्राप्रमाणे भिन्न तसेच कुंडली पाहून व्यक्तिगत सविस्तर सल्ला दिला जाईल….
महाराष्ट्रभर वास्तू व्हिजिट कॉम्प्युटर कुंडली शुभनवरत्न व्यक्तिगत सविस्तर ज्येष्ठ मार्गदर्शन भवानी ज्योतिष.. पं. दिनेशपंत ..फक्त व्हाट्सअप संपर्क 9373 91 34 84.
Horoscope Aquaris Kumbha 2023 New Year